Kanpur News
Kanpur News Saam Tv
देश विदेश

बँकेचा मोठा निष्काळजीपणा; खोक्यात नोटा ठेवल्या; पाणी शिरल्याने 42 लाखांचा झाला लगदा

वृत्तसंस्था

कानपूर - लोक त्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेत ठेवतात. पण बँका स्वत:कडे ठेवलेल्या नोटा किती जबाबदारीने ठेवतात, याचे एक उदाहरण उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये (Kanpur) पाहायला मिळाले. शहरातील पांडू नगर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत एका खोक्यात 42 लाख रुपयांच्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. या खोक्यात पाणी शिरल्याने यातील काही नोटांचा लगदा झाला आहे. त्यामुळे बँकेतील रकमांच्या सुरक्षिततेबाबतचे आता प्रश्नचिन्हं निर्माण झाली आहेत.

3 महिन्यांपूर्वी या नोटा बँकेत एका खोक्यात ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, खोक्यात या खोक्यात पाणी शिरले आणि नोटा भिजल्या. बँक कर्मचार्‍यांनी खोक्यात सर्वात वरच्या नोटा पाहिल्या, मात्र, खोक्याच्या खालून पाणी शिरल्याचं त्यांच्या लक्षातच आलं नाही.

हे देखील पाहा -

बँकेच्या तिजोरीत जागाच शिल्लक नसल्याने या 42 लाख रुपयांच्या नोटा एका खोक्यात ठेवण्यात आल्या होत्या. रोकड वाढली की नोटा बॉक्समध्ये भरून भिंतीवर ठेवल्या जायच्या. याठिकाणी पावसात तळघराची भिंत ओलसर झाल्याने खोक्यात पाणी शिरले. त्यामुळे खोक्यात खालून पाणी गेलं आणि नोटा भिजल्याने त्याचा लगदा झाला.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) पथक पाहणीसाठी दाखल झाले. तपास सुरू होताच हे प्रकरण वरील अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले. त्यानंतर पीएनबीच्या व्हिजिलन्स टीमनेही या प्रकाराची चौकशी सुरू केली. अखेर नोटांची दखल का घेतली जात नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. 

या दोन्ही अहवालानंतर पीएनबीच्या उच्च अधिकाऱ्यांनी पांडू नगर शाखेच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले. ज्यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक देवीशंकर, व्यवस्थापक आसाराम, चेस्ट ऑफिसर राकेश कुमार आणि वरिष्ठ व्यवस्थापक भास्कर कुमार भार्गव यांचा सहभाग आहे. देवीशंकर यांनी 25 जुलै रोजीच पांडू नगर शाखेचा पदभार स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. नोटांचा लगदा झाल्याची घटना त्यापूर्वीची आल्याचे बोलले जात आहे. सध्या पीएनबीकडून या घटनेवर कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Murbad Railway Line: कल्याण मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतक-यांचा विरोध, पाेलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदाेलन शमले

Herbal Tea पिणं आरोग्यासाठी लाभदायी

Accident News: भरधाव पिकअप अनियंत्रित होऊन टेम्पोला धडकला; भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू, थरारक VIDEO

Tulsi Vastu Tips: सकाळी तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ काय?

Today's Marathi News Live : महाविकास आघाडीची उद्या सेनाभवनमध्ये संविधान वाचवा सभा

SCROLL FOR NEXT