Chhatrapati Shivaji Maharaj  Saam Tv
देश विदेश

Chhatrapati Shivaji Maharaj : 'छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर माझं नाव...', भाजपच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत

MP News : शिवजयंतीच्या निमित्ताने मध्यप्रदेशमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. तेव्हा भाजप पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने केलेल्या विधानाची सध्या चर्चा होत आहे.

Yash Shirke

Chhatrapati Shivaji Maharaj News : मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि भारतीय जनता पक्षातील दिग्गज नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या एका विधानाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी त्यांनी वक्तव्य केले होते. 'शिवराय नसते, तर माझं नाव कैलाश नसतं' असे ते म्हणाले. मध्यप्रदेशच्या राजकारणात कैलाश विजयवर्गीय यांचे मोठे नाव आहे. ते भाजपचे माजी राष्ट्रीय महासचिव आहेत.

महाराष्ट्राप्रमाणे देशभरात काल शिवजयंती साजरी करण्यात आली. मध्यप्रदेशच्या इंदूरमध्येही शिवजयंतीच्या निमित्ताने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये कैलाश विजयवर्गीय यांनी 'जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर माझं नाव कैलाश नसून कलीमुद्दीन असतं' असे विधान केले.

मंत्री कैलाश विजयवर्गीय म्हणाले, 'आज जर हिंदू धर्म जीवंत तो फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच.. त्यांनी माळवा, छत्तीसगडपर्यंत मुघलांना घुसूच दिले नाही. ते जर नसते तर आज माझं नाव कलीमुद्दीन असतं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी मोठी फौज उभी केली होती. त्यांनी मावळ्यांसोबत मुघलांच्या लाखोंच्या सेनेचा पराभव केला.'

'छत्रपती शिवाजी महाराज यांनी सनातन धर्माचे रक्षण केले. त्यांच्यामुळे दक्षिणेकडच्या भागांमध्ये मुघल घुसू शकले नाही. शिवाजी महाराज यांच्यानंतर ब्रिटीश भारतात शिरले. महाराज जर असते, तर ब्रिटीश आपल्या देशात घुसू शकले नसते', असे विधान कैलाश विजयवर्गीय यांनी शिवजयंतीच्या एका कार्यक्रमामध्ये केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Crime: मेहुण्याच्या प्रेमात झाली वेडी, जगात येण्यापूर्वीच बाळाला संपवलं अन् कचऱ्यात फेकलं

SCROLL FOR NEXT