leena manimekalai, twitter trends, trending news, kali poster controversy saam tv
देश विदेश

'काली' पाेस्टरच्या वादात भारतीय उच्चायुक्तांची उडी; तातडीने पाेस्टर हटविण्याची कॅनडा सरकारकडे मागणी

"हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल, 'काली' या माहितीपटाच्या निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे," असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

साम न्यूज नेटवर्क

ओटावा : काली (Kaali) या माहितीपटावरील पाेस्टरमुळे (Kaali Poster) दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांच्यावर गेले दाेन दिवस समाज माध्यमातून (social media) राेष व्यक्त हाेऊ लागला आहे. दरम्यान या माहितीपटात टोरंटो येथील आगा खान म्युझियम (Aga Khan Museum) येथे 'अंडर द टेंट' प्रकल्पाचा भाग म्हणून दाखवण्यात आलेले हिंदू (hindu) देवतांचे अनादर करणारे चित्रण मागे घेण्याची विनंतीवजा मागणी भारतीय उच्चायुक्तांनी कॅनडाच्या (canada) अधिकाऱ्यांना केली आहे. धूम्रपान करणारी स्त्री असे चित्रण देवी कालीचे चित्रित करणे याेग्य नसल्याचे अधिका-यांनी म्हटले आहे. (Leena Manimekalai Latest Marathi News)

कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यामध्ये "आम्ही कॅनडाच्या अधिकाऱ्यांना आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना असे सर्व प्रक्षोभक साहित्य मागे घेण्याचे आवाहन करतो असे नमूद केले आहे.(kali poster controversy News Updates)

Press Release From High Commission Of India

धार्मिक भावना दुखावल्या

चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांनी दिग्दर्शित केलेल्या माहितीपटाच्या पोस्टरमुळे माेठ्या प्रमाणात मणिमेकलाई यांच्यावर टीका हाेऊ लागली. भारतीय उच्चायुक्तांनी देखील याची देखील घेतली. टोरंटोमधील दूतावासाने या कार्यक्रमाच्या आयोजकांना याबाबत कळवले. तसेच आम्हाला असेही कळविण्यात आले आहे की अनेक हिंदू गटांनी कारवाई करण्यासाठी कॅनडामधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, लीना मणिमेकलाई यांच्या ‘काली’ च्या पोस्टरद्वारे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दिल्लीत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे मणिमेकलाई अडचणीत सापडल्या आहेत. काहींनी तर तिच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आणि ट्विटरवर '#ArrestLeenaManimekal' हा हॅशटॅग करुन तिच्या अटकेची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT