Jyoti Malhotra  Saam TV News
देश विदेश

Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राच्या डायरीत गद्दारीचे पुरावे, 'Love You अन् खुश-मुश'; पोलिसांना काय मिळालं?

Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्रा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस रविवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास तिला घरात घेऊन गेले होते. यावेळी ज्योतीने घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.

Prashant Patil

यूट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्या गद्दारीचे एकेक पुरावे रोज समोर येत आहेत. त्यात आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलाय. ज्योती आणि आयएसआय अधिकारी अली हसन यांच्यातलं एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आलंय. त्यात अटारीवर एखाद्या अंडर कव्हर एजंटबाबत माहिती काढण्याचं काम ज्योतीवर आयएसआयने सोपवलं होतं हे दिसून येतंय. अंडर कव्हर एजंटला भूलवून त्याला एका गुरूद्वारात नेण्याचे आदेश अली हसन ज्योतीला देत असल्याचं या चॅटमधून उघड होतंय. पाकिस्तानी आयएसआय ही संघटना ज्योतीचा वापर भारतीय गुप्तहेरांची माहिती काढण्यासाठी करत असल्याचे हे पुरावे आहेत.

ज्योती मल्होत्रा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस रविवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास तिला घरात घेऊन गेले होते. यावेळी ज्योतीने घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी तिने घरातील मोलकरणीला लिहिली होती. 'सविता को कहना फ्रूट ला दे। घर का ख्याल रखे, मैं जल्दी जाऊंगी' असं ज्योतीने या चिठ्ठीत लिहिलं होतं. तसंच एका औषधाचं आणि डॉक्टरचं नाव आणि शेवटी लव यू.. खुश-मुश, असं लिहिलं आहे.

हेरगिरी प्रकरणातील आरोपी ज्योती मल्होत्राच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्यूएन्झर्सशीही संपर्क असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्योतीची यूट्यूबर मैत्रीण प्रियांकाचीही ओडिशातील पुरीत कसून चौकशी सुरु आहे. कुरूक्षेत्र भागातील एकाने ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिली. तर इतर इन्फ्ल्यूएन्झर्सशी संपर्कासाठी पाकिस्तानी ज्योतीला वापरत होते. तसेच पाकिस्तानसह चीनलाही ज्योती मल्होत्रा जाऊन आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके पुन्हा दिल्लीमधील आंदोलनात सहभागी होणार

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

धक्कादायक! मेट्रोमध्ये फक्त सीटवरून वाद, तरूणाचा करुण अंत; आरोपीचं हायप्रोफाईल कनेक्शन समोर

SCROLL FOR NEXT