Chand Nawab Saam TV
देश विदेश

बंजरंगी भाईजान मधील पत्रकार चांद नवाब पुन्हा व्हायरल; पाहा Video

पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब यांनी पुन्हा एकदा बजरंगी भाईजान चित्रपटाची आठवण करून दिली.

वृत्तसंस्था

पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब यांनी पुन्हा एकदा बजरंगी भाईजान चित्रपटाची आठवण करून दिली. चांद नवाब (Chand Nawab Video Viral) यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते कराचीतील समुद्रकिनारी धुळीचे वादळ आणि थंड वारे वाहत असल्याचे सांगत आहेत. कराचीतील समुद्रकिनारी हवामान खूप थंड आहे, त्यामुळे दुबई किंवा परदेशात जाण्याची गरज नाही, असं ते सांगत आहेत, पण त्याचवेळी ते सांगत आहेत की लुकड्या लोकांनी इथे येऊ नये. ते या वाऱ्याने उडून जातील. पाकिस्तानातील अनेकांनी त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना ट्रोल केले आहे. बजरंगी भाईजान या चित्रपटात चांद नवाबची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली होती.

व्हिडिओमध्ये काय आहे

चांद नवाब हातात न्यूज चॅनलचा माईक घेऊन बोलत आहेत. यावेळी मी कराचीत साहिलवर उभे आहेत, तिथे मातीचे वादळ आलेले दिसत आहे, थंडगार वारे वाहत आहेत, वातावरण खूप आल्हाददायक आहे, मी शहरी भागात आहे. पण या वादळामुळे माझे केस उडत आहेत, तोंडावर प्रचंड धूळ उडत आहे. मला माझे डोळेही उघडता येत नाहीयेत. ज्यांची तब्येत बारीक आहे त्यांनी इथे येऊ नये, ते वाऱ्यासोबत उडून जाऊ शकतात पण हवामान आल्हाददायक आहे असे गमतीशीर ते या व्हिडिओमध्ये बोलत आहेत, त्यांचा हा व्हिडिओ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पवईतील भयावह घटनेत नांदेडच्या पाच विद्यार्थ्यांचा समावेश|VIDEO

MPSC Topper: आयुष्यात काही राहायला नको... MPSC मध्ये सोलापूरचा विजय लकमने टॉपर, प्रेरणादायी प्रवास वाचा

Maharashtra Live News Update: शिवसेना महिला पदाधिकारी आक्रमक; रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी

कुंभमेळ्यापूर्वी नाशिक महानगरपालिकेत मोठी भरती, ३४८ रिक्त पद भरली जाणार; कसा कराल अर्ज?

Whatsapp चं नवं फीचर! आता चॅट बॅकअपसह प्रायव्हेट मेसेज अन् व्हिडिओ राहणार सुरक्षित; आताच करा हे काम

SCROLL FOR NEXT