Kabul Attack: 'हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही'- जो बायडन (व्हिडीओ) Saam Tv
देश विदेश

Kabul Attack: 'हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही'- जो बायडन (व्हिडीओ)

काबूल विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका प्रचंड संतापली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्लामिक स्टेटला गंभीर हल्ल्यासाठी जबाबदार असल्याने त्याच्या परिणामांना तयार राहण्यासाठी चेतावणी दिली आहे.

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन: काबूल विमानतळावरील दहशतवादी Kabul Airport Attack हल्ल्यानंतर अमेरिका America प्रचंड संतापली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन President Joe Biden यांनी इस्लामिक स्टेटला ISIS गंभीर हल्ल्यासाठी जबाबदार असल्याने, त्याच्या परिणामांना तयार राहण्यासाठी चेतावणी दिली आहे. दिला आहे. आपले सैनिक आणि सामान्य अफगाणांच्या मृत्यूबद्दल भावनिक होत, जो बायडन म्हणाले की, आयएसआयएसला त्याची किंमत मोजावी लागेल. ही जखम आम्ही विसरणार नाही. आम्ही प्रत्येक दहशतवादी शोधून त्यांना ठार मारू. Biden addresses nation in response to Kabul airport attack

अध्यक्ष बायडेन झाले भावूक;

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी काबूल विमानतळावर एकापाठोपाठ तीन स्फोट Blasts झाले. या हल्ल्यात 10 अमेरिकन कमांडोंसह 64 जणांचा मृत्यू Death झाला. या हल्ल्यात झालेल्या मृत्यूंमध्ये मृतांमध्ये महिला आणि लहान मुलेही आहेत. इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे त्यामुळे जो बिडेन यांनी काबूल हल्ल्यानंतर देशाला संबोधित करताना इसिसचा बदला Revenge घेण्याची शपथ घेतली. राष्ट्राला संबोधित करताना ते भावूकही झाले होते. यावेळेस त्यांनी प्रथम शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर दहशतवादी संघटनेच्या विरोधात मोहीम जाहीर केली.

तालिबानने अंतिम 31 तारीख ही मुदत निश्चित केली असेल, परंतु बचावकार्य सुरूच राहील, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. बिडेन म्हणाले की आम्ही अमेरिकन नागरिकांची अफगाणिस्तानातून सुटका करू. काबुल विमानतळावर अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिक अजूनही उपस्थित आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT