Haribhau bagade Saam
देश विदेश

Haribhau Bagade: जोधा अकबरची कहाणी खोटी, अकबरचं लग्न जोधाशी नव्हे तर.., राज्यपाल बागडेंचा मोठा दावा

Governor Hari Bhau Bagde Controversial Claim: जोधाबाई आणि मुघल सम्राट अकबर यांच्या विवाहाचा उल्लेख "अकबरनामा"मध्येच नाही, त्यामुळे त्यावर आधारित चित्रपट काल्पनिक असल्याचा दावा राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केला आहे.

Bhagyashree Kamble

Governor Hari Bhau Bagde: राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी अलिकडेच एक खळबळजनक दावा केला आहे. भारतीय इतिहासलेखनात ब्रिटिशांच्या प्रभावामुळे अनेक खोट्या गोष्टींचा समावेश झाला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. विशेषत: जोधाबाई आणि मुघल सम्राट अकबर यांच्या विवाहाचा उल्लेख "अकबरनामा"मध्येच नाही, त्यामुळे हा विवाह आणि त्यावर आधारित चित्रपट हे पूर्णतः काल्पनिक असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

उदयपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल बागडे म्हणाले, "असे म्हटले जाते की जोधा आणि अकबर यांचे लग्न झाले होते. यावर एक भव्य चित्रपटही बनवण्यात आला होता. इतिहास देखील तेच सांगतो. मात्र, हे खरे नाही. अकबरचे लग्न जोधाबाईंशी नव्हे, तर भारमल नावाच्या राजाने त्यांच्या एका दासीच्या मुलीशी लावून दिले होते", असं बागडे यांनी स्पष्ट केलं.

ब्रिटिशांनी आपल्या वीरांचा इतिहास बदलला

राज्यपाल बागडे यांनी आपल्या इतिहासावर ब्रिटिश प्रभाव असल्याचं सांगितलं, "ब्रिटिशांनी आपल्या वीरांचा इतिहास बदलून दाखवला. त्यांनी तो पूर्णपणे नोंदवलाच नाही, आणि जे काही लिहिले तेही एकतर्फी होतं. त्यानंतरही काही भारतीय इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासावर ब्रिटिश प्रभाव होता", असा दावा त्यांनी केला.

बागडे यांनी इतिहासातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, महाराणा प्रताप यांनी अकबराला युद्धबंदीसाठी पत्र लिहिल्याचा दावा खोटा आहे. "महाराणा प्रताप कधीच त्यांच्या स्वाभिमानाशी तडजोड करत नव्हते. इतिहासात अकबरावर भर दिला जातो, पण महाराणा प्रताप यांच्याविषयी फारच कमी शिकवलं जातं," असंही त्यांनी नमूद केलं.

छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप हे देशभक्तीचे प्रतिक असल्याचं बागडे म्हणाले, "महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोघेही देशभक्तीचे प्रतीक होते. त्यांच्या जन्मात ९० वर्षांचं अंतर होतं. जर ते एकाच काळात असते, तर देशाचं भवितव्य वेगळं असतं."

बागडे यांनी पुढे सांगितले की, "नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे हळूहळू परिस्थिती बदलत आहे. नव्या पिढीला आपल्या संस्कृतीचा अभिमान, इतिहासाची जाणीव आणि स्वाभिमान शिकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून ते सर्व क्षेत्रांत पुढे जाऊ शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valache Birde Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा वालाचा बिरडा कसा बनवायचा?

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Live News Update : पनवेलजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

राज्यातील सर्व शाळा उद्या बंद; पुण्यात उद्या शिक्षक शिक्षकेतर संघटनेचा एल्गार

SCROLL FOR NEXT