Abhijeet Dipke Jharkhand Students JPSC Exam Irregularities Protest : झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि कर्मचारी निवड आयोग (JSSC CGL) भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपर फुटीविरोधात मागील ११ दिवसांपासून झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या राजकीय व बाहेरील संघटनांना विद्यार्थ्यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावरून जाहीर केलेला पाठिंबा आंदोलक विद्यार्थ्यांनी थेट फेटाळून लावला आहे.
हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आहे. यात कोणत्याही राजकीय पक्षाचे राजकारण किंवा बाहेरील नेत्यांची ढवळाढवळ आम्ही खपवून घेणार नाही. आमची लढाई ही कोणतेही राजकारण नाही आणि कोणतीही शिवीगाळ नाही या तत्त्वावरच चालणार आहे, असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. मागील आठवड्यात अभिजित दिपके यांनी झारखंडमधील आंदोलकांसोबत फोनवर चर्चा करून पाठिंबा दर्शवला होता. त्याशिवाय कोणतीही मदत करण्याची तयारी असल्याचे सांगितले होते. पण आता झारखंडमधील विद्यार्थ्यांकडून दिपके आणि सीजीपी यांची मदत नको असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. त्याशिवाय आमच्या आंदोलनाचे राजकारण करू नये, असेही ठणकावले आहे.
झारखंडच्या विद्यार्थ्यांची नेमकी मागणी काय आहे?
जयपाल सिंह मुंडा स्टेडियम आणि अल्बर्ट एक्का चौकात हजारो विद्यार्थी एकत्र आले असून, त्यांनी मशाली मार्च काढत राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली आहेत. १४ व्या JPSC आणि JSSC CGL परीक्षांमध्ये OMR शीट आणि कट-ऑफ गुण पद्धतीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या परीक्षा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली जात आहे. सीआयडी (CID) तपासावर विश्वास नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी संपूर्ण परीक्षा घोटाळ्याची सीबीआय (CBI) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
झारखंडमधील विद्यार्त्यांचे मागील ११ दिवसांपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. झारखंडमधील तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन सुरू आह. झारखंडमधील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दीपके आणि सीजेपीचा त्यांच्या आंदोलनातील सहभाग नाकारलाय. विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, हे आंदोलन त्यांना स्वतंत्र, शांततापूर्ण आणि राजकीय प्रभाव किंवा चिथावणीखोर घोषणांपासून मुक्त ठेवायचे आहे. झारखंडमधील विद्यार्थ्यांनी जेएमएमचे संस्थापक शिबू सोरेन यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली मार्चचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांनी १० ऑगस्ट रोजी मोठ्या आंदोलनाचा इशाराही दिलाय. त्यावेळी रांचीमध्ये तरूण रस्त्यावर उतरतील, असे सांगण्यात येत आहे.
मैदानावर यायला सांगितलं अन् टायफॉइड झाला, दीपकेंवर गंभीर आरोप
'न्यूजपिंच'शी बोलताना एका संतप्त विद्यार्थी आंदोलकाने अभिजीत दिपके यांच्यावर गंभीर आरोप केले. तुम्हाला माहिती आहे का त्याने काय केले? त्याने व्हिडिओ क्लिप एडिट करून अवघ्या १ मिनिटाची केली आणि त्यातून 'काँग्रेस' हा शब्द पूर्णपणे काढून टाकला. इथे आमचा एक दिव्यांग भाऊ रडत होता, त्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला कशी मारहाण केली हे सांगितलं होतं. पण अभिजीतने भीतीपोटी तो भागसुद्धा व्हिडिओतून काढून टाकला. तो एसी रूममध्ये बसून शंभर टीव्ही मुलाखती देऊ शकतो, पण ज्या क्षणी आम्ही त्याला थेट झारखंडमध्ये मैदानावर येऊन आंदोलनात सहभागी व्हायला सांगितले, त्याच क्षणी त्याला अचानक 'टायफॉइड' झाला, असा घणाघाती आरोप या विद्यार्थ्याने केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.