Champai Soren Saam TV
देश विदेश

Champai Soren: झारखंडचे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन; राज्यपालांसमोर पार पडला शपथविधी

Jharkhand News: राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्यासमोर हा शपथविधी पार पडला. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी त्यांना १० दिवसांचा कालावधी दिलाय.

Ruchika Jadhav

Jharkhand

झारखंडच्या मुख्यमंत्री पदी मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन विराजमान झाले आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्यासमोर हा शपथविधी पार पडला. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी त्यांना १० दिवसांचा कालावधी दिलाय.

चंपाई सोरेन यांची राजकीय कारकिर्द

चंपाई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्च्याचे वरिष्ठ नेते आणि उपाध्यक्ष आहेत. चंपाई सोरेन हे सरायकेला मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने निवडून आलेत. त्यांच्याकडे आदिवासी कल्याण विभागाचा कार्यभार आहे. हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळातही चंपाई सोरेन यांचा सामावेश होता. त्यांच्याकडे वाहतूक विभागाची जबाबदारी होती. तर याआधी अर्जुन मुंडा सरकारच्या कार्यकाळातही त्यांनी मंत्रिपद भूषवलं आहे.

चंपाई सोरेन हे झारखंडच्या राजकारणातील वरिष्ठ नेते शिबू सोरेन यांच्या जवळचे मानले जातात. चंपाई हे झारखंडमध्ये 'टायगर' नावानेही ओळखले जातात.

हेमंत सोरेन यांनी ३१ जानेवारी रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतरच हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री चंपाई सोरेन हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील अशी चर्चा रंगली होती. आज अखेर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्क्कादायक! बहिणीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, अपहरण केलं अन्...

Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: धरण भरलं, पण जळगाव तहानलेलंच! हतनूरचं लाखो लिटर पाणी समुद्रात

DA Hike: सरकारी कर्मचारी अन् पेन्शनधारकांची लॉटरी! महागाई भत्त्यात मोठी वाढ; पाहा किती वाढणार पगार?

Moving car safety: धावत्या गाडीत सीट बदलणं का धोकादायक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT