JPSC Exams Hemant Soren Jharkhand High court AI image
देश विदेश

JPSC exams : सोरेन सरकारला जोरदार झटका; JPSC परीक्षा-नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय हायकोर्टाकडून स्थगित

jharkhand high court stays hemant soren governments jpsc cancellation order : जेपीएससी परीक्षांच्या माध्यमातून झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय झारखंड सरकारने घेतला होता. त्याला झारखंड हायकोर्टाने स्थगिती दिली.

Nandkumar Joshi

झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वातील सरकारला हायकोर्टानं जोरदार झटका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने अलीकडेच जेपीएससी परीक्षा आणि त्या माध्यमातून झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर हायकोर्टाने स्थगिती आणली. परीक्षा आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात वेगवेगळ्या याचिका झारखंड हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टाच्या सरकारच्या आदेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.

नवनियुक्त अधिकाऱ्यांना मोठा दिलासा

सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती मिळाल्याने नवनियुक्त अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची सुनावणी हायकोर्टाचे न्यायाधीश दीपक रौशन यांच्यासमोर झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील इंद्रजीत सिन्हा, अमृतांश वत्स यांनी युक्तिवाद केला. तर सौरभ सिंह, अवधेश कुमार, दीप माला आणि सोनम कुमारी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. जेपीएससी परीक्षांच्या माध्यमातून नियुक्त होऊन सरकारी नोकरी करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका कोर्टात केली केली.

तत्पूर्वी, जेपीएससी आणि जेएसएससीच्या परीक्षा आणि नियुक्त्यांमध्ये कथितरित्या अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून झारखंडची राजधानी रांचीमध्ये अनेक दिवस विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. त्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अनेक परीक्षा आणि त्या माध्यमातून झालेल्या नियुक्त्या रद्द करण्यात येतील अशी घोषणा केली होती. याशिवाय परीक्षा सुधारणांसाठी एक समिती स्थापन करण्यासह दोन्ही आयोगांत अंतर्गत समित्या आणि इतर निर्णय घेण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT