Jharkhand Education Minister Ramdas Soren SaamTv News
देश विदेश

शिक्षणमंत्री बाथरूमला गेले अन् पाय घसरून पडले; डोक्याला गंभीर दुखापत, रूग्णालयात उपचार सुरू | Jharkhand

Minister Ramdas Soren: शिक्षणमंत्री रामदास सोरेन बाथरूममध्ये पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. झारखंडचे आरोग्यमंत्री इरफान अन्सारी यांनी ही माहिती दिली आहे.

Bhagyashree Kamble

  • झारखंडचे शिक्षणमंत्री रामदास सोरेन बाथरूममध्ये घसरून पडले.

  • त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूत रक्तस्राव झाला आहे.

  • सध्या त्यांच्यावर जमशेदपूर रुग्णालयात उपचार सुरू असून दिल्लीला हलवण्याचे नियोजन आहे.

  • झारखंडचे आरोग्यमंत्री इरफान अन्सारी हे स्वतः त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

झारखंडचे शिक्षणमंत्री रामदास सोरेन यांना गंभीर दुखापत झाली आहे. ते शनिवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानाच्या बाथरूममध्ये पडले. बाथरूममध्ये पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. यासंदर्भात मंत्री इरफान अन्सारी यांनी माहिती दिली आहे. तसेच त्यांंच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

अन्सारी म्हणाले, सोरेन यांना आज सकाळी जमशेदपूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना उत्तम उपचारासाठी दिल्लीतील रूग्णालयात नेण्याची तयारी सुरू आहे. अन्सारी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, 'रामदास सोरेन यांची प्रकृती अचानक बिघडली. ते बाथरूममध्ये पडले. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यासह रक्ताची गाठ तयार झाली आहे', अशी माहिती त्यांनी दिली.

'सोरेन यांना जमशेदपूर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आम्ही त्यांना दिल्लीला नेण्याची तयारी करत आहोत. मी सतत त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे', अशी माहिती त्यांनी दिली. सोरेन यांना किडनीचा आजार देखील आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, अनेक नेत्यांनी त्यांची विचारपूस केली आहे.

रामदास सोरेन हे झारखंड चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यानंतर त्यांनी चंपाई सोरेन झारखंड मुक्ती मोर्चा सोडून भाजपमध्ये सामील झाले. त्यानंतर ते पक्षात एक मोठे नेते म्हणून उदयास आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत छावा क्रांतिवीर सेनेचा वर्धापनदिन

6,6,6,6,6,6....दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा फलंदाजाची वादळी खेळी, VIDEO

...नाहीतर शिक्षणमंत्र्यांच्या घरात कुत्रे सोडू, बच्चू कडूंचा इशारा|VIDEO

Sleep Facts: स्वप्नात ओरडलो तरी आवाज निघत नाही? असं का होतं?

राज ठाकरेंचा मुंबईत नवा डाव; गुजराती आणि मुस्लिम उमेदवार मैदानात|VIDEO

SCROLL FOR NEXT