Jagarnath Mahato Saam tV
देश विदेश

Jagarnath Mahato Death: झारखंडचा 'वाघ' गेला! शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांचं निधन, अधिवेशनादरम्यान अचानक बिघडली होती तब्येत

Jagarnath Mahato Death: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत याबाबत माहिती दिली.

प्रविण वाकचौरे

Jharkhand News: झारखंडचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांचं निधन झालं आहेत. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यावेळी त्यांना तातडीने एअरलिफ्ट करत चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, आमचा वाघ जगरनाथ नाही राहिला! आज झारखंडने आपला महान आंदोलनकर्ता, एक लढवय्या, कष्टाळू आणि लोकप्रिय नेता गमावला. आदरणीय जगरनाथ महतोजी यांचे चेन्नई येथे उपचारादरम्यान निधन झाले. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल परिवाराला या दु:खाच्या वेळी सहनशक्ती देवो. (Latest News Update)

गेल्या महिन्यात 14 मार्च रोजी विधानसभा अधिवेशनादरम्यान त्यांची तब्येत बिघडली होती. त्यावेळी हेमंत सोरेन यांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने एअरलिफ्ट करुन चेन्नई येथे आणण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर मागील 22 दिवसांपासून उपचार सुरु आहे. मात्र आज त्यांचं निधन झालं. (Political News)

टायगर म्हणून ओळख

जगरनाथ महतो यांचं लंग्स ट्रान्सप्लान्ट करण्यात आलं होतं. मात्र त्यांनतर त्यांची प्रकृती आणखीच बिघडली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जगरनाथ डुमरी विधानसभा क्षेत्रातील आमदार होते. झारखंड मुक्ती मोर्चाचे महत्वाचे नेते होते. पक्षात त्यांना टायगर म्हणूनही ओळखलं जात असे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळांच्या विजयाचा मोठा जल्लोष; जेसीबीतून फुलांचा वर्षाव

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT