crime news Saam TV
देश विदेश

Crime : देशात चाललंय काय? दिल्ली, राजस्थाननंतर झारखंड क्रूर घटनेने हादरलं; २२ वर्षीय तरुणीच्या शरीराचे आढळले १२ तुकडे

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी आणखी एक क्रूर घटना झारखंडमध्ये घडली आहे

साम टिव्ही ब्युरो

Jharkhand Crime News : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी आणखी एक क्रूर घटना झारखंडमध्ये घडली आहे. या क्रूर घटनेने झारखंडमध्ये खळबळ उडाली आहे. २२ वर्षीय तरुणीचे कटरने १२ तुकडे केल्याची घटना समोर आली आहे. रबिका पहाडीन असे मृत महिलेचे नाव आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, दिलदार अन्सारी या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रुबिका झारखंडमधील (Jharkhand) बोरियो पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. रुबिका पती दिलदारसोबत बेलटोला येथे राहत होती. पती दिलदारने रुबिकाची क्रूर हत्या केल्याचा संशय पोलिसांचा आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रुबिकाचे मृतदेहाचे तुकडे शनिवारी सायंकाळी ६ वाजता बोरिया पोलीस ठाण्यातील क्षेत्रात संथाली मोमिन टोला येथील जुन्या घरात क्रूर घटना उघडकीस आली. त्या घरात पोलिसांना रुबिकाचे १२ तुकडे आढळून आले. परंतु मृत रुबिकाचं धड आणि शरीराचा काही भाग पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

मृत महिलेची ओळख पती दिलदार अन्सारीने केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रुबिका पहाडीन ही दिलदारची दुसरी पत्नी होती. या प्रकरणी पोलिसांनी दिलदारला रात्री २ वाजेपर्यंत ताब्यात घेऊन कसून चौकशी केली आहे.

शनिवारी सांयकाळी ६ वाजता मोमिन टोला येथे नवनिर्मित अंगणवाडी केंद्राच्या मागे लोकांनी कुत्र्यांना मानवी मांस खाताना पाहिले, तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा आणखी उलगडा सुरू आहे. पोलिसांच्या महितीनुसार, मृतदेहाचे तुकडे हे इलेक्ट्रिक कटरने केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Tea: थकवा घालवायचाय? रोज सकाळी प्या ब्लॅक टी, शरीराला मिळतील अनेक फायदे

Matheran Mini Train : पर्यटकांसाठी खुशखबर! नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ६ नोव्हेंबरपासून धावणार | VIDEO

Local Body Election : युती नकोच! राज ठाकरेंना काँग्रेसचा जोरदार धक्का, उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Local Body Election : नगराध्यक्ष कोण? निवडणुकीच्या घोषणेआधीच भाजपची ३-३ नावे, प्रदेशाध्यक्षांकडे यादी पोहचली

SCROLL FOR NEXT