Rahul Gandhi and Mallikarjun Kharge  Saam Tv
देश विदेश

Congress Second List : काँग्रेसची दुसरी यादीही आली; कुणाला मिळाली उमेदवारी, कुणाचा पत्ता कट?

Jharkhand Assembly Election : महाराष्ट्रात काँग्रेसनं पहिली यादी जाहीर केली असून, झारखंडमधील दुसरी यादीही जाहीर केली आहे. बरहीचे आमदार उमाशंकर अकेला यांचा पत्ता कट केला आहे. तिथे अरुण साहू यांना उमेदवारी दिली आहे.

Nandkumar Joshi

महाराष्ट्रात (Maharashtra) काँग्रेसनं पहिली यादी जाहीर केली आहे. अनेक ठिकाणी तगडे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. झारखंडमध्येही काँग्रेसनं जोरदार तयारी केली असून, दुसरी यादी जाहीर केली आहे. बरही विधानसभा मतदारसंघातील उमाशंकर अकेला यांचा पत्ता कट झाला आहे. अरुण साहू यांना उमेदवारी दिली आहे. कांके मतदारसंघात सुरेश कुमार बैठा यांना मैदानात उतरवलं आहे. आलमगीर यांच्या जागी त्यांची पत्नी निशात आलम यांना पाकूडमधून उमेदवारी दिली आहे.

विश्रामपूर मतदारसंघातून इंडिया आघाडीचा (India alliance) घटकपक्ष राष्ट्रीय जनता दलानंतर काँग्रेसनेही (Congress Candidate second List) आपला उमेदवार रणांगणात उतरवला आहे. तेथून सुधीर कुमार चंद्रवंशी यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनी घोषित केलेल्या यादीनुसार, पांकी मतदारसंघात लाल सूरज, डालटनगंज येथून के. एन. त्रिपाठी आणि छरतपूर येथून राधाकृष्ण किशोर यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिली आहे.

धनबाद आणि बोकारो या मतदारसंघांत काँग्रेसने अद्याप अधिकृत उमेदवार घोषित केलेले नाहीत. डालनगंज येथून के. एन. त्रिपाठी यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाने २०१९ मध्ये पांकी मतदारसंघातून देवेंद्र सिंह उर्फ बिट्टू सिंह यांना उमेदवारी दिली होती. तर विश्रामपूरमधून चंद्रशेखर दुबे यांना आखाड्यात उतरवलं होतं.

काँग्रेसला झटका

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उमाशंकर अकेला यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. बरही येथून समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत ज्येष्ठ नेते उमाशंकर यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो असे मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parvati Exit Poll: पर्वतीमधून भाजपच्या माधुरी मिसाळ होणार आमदार? पाहा EXIT POLL

Aurangabad Central Exit Poll: औरंगाबाद मध्य मतदारसंघात कोण विजयी होणार? संभाव्य आमदाराचं नाव आलं समोर

Amitabh Bachchan : 'फक्त अफवा...' ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्यावर अखेर बिग बींनी सोडलं मौन, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Exit Poll: कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ऋतुराज गायकवाड होणार आमदार? पाहा Exit Poll

Japanese Hotels: तुम्ही कधी जपान लव्ह हॉटेलबद्दल ऐकले आहे का?

SCROLL FOR NEXT