देश विदेश

Jharkhand Assembly : काँग्रेसकडून जाती-जातीचं राजकारण; झारखंडमध्येही मोदींनी दिला 'एक है तो सेफ है' चा नारा

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार करत आहेत. रविवारी झारखंड येथील एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ है चा नारा दिला.

Bharat Jadhav

काँग्रेस अनुसूचित जाती. अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गातील लोकांना तोडत त्यांना छोट्या-छोट्या जातींमध्ये विभागत आहे. देशाला स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस समाजाचं विभागणी केल्याचा फायदा घेत आहे. राज्यात आणि केंद्रात त्याच्या आधारे सत्ता मिळवत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पंतप्रधान मोदींनी झारखंडमधील लोकांना एकोप्याने राहण्याचा सल्ला देत 'एक है तो सेफ है' चा नारा दिला. ते येथील एका प्रचार सभेत बोलत होते.

काँग्रेस नेहमी एससी , एसटी आणि ओबीसीच्या एकोप्याला विरोध राहिलीय. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हापर्यंत एससी, एसटी समाज आणि ओबीसी समाज विभक्त राहिला तेव्हा काँग्रेसने फोडा आणि राज्य करा या सिद्धांतावर केंद्रात सत्ता मिळवली. परंतु जेव्हा आपण एकजूट झालो तसं काँग्रेस बहुमताने कधीच केंद्रात सत्ता स्थापन करून शकली नाही. काँग्रेसचं हे गणित समजून घ्या म्हणत मोदींनी लोकांना राजकारणातील उदाहरण दिलं.

१९९० मध्ये ओबीसी समाजाला जेव्हा आरक्षण मिळालं तेव्हा इतर जाती यात जुडल्या. त्यानंतर काँग्रेस आतापर्यंत लोकसभेत २५० जागा जिंकू शकली नाही. त्याचमुळे काँग्रेस ओबीसी समाजाची ताकद तोडण्याचा प्रयत्न करत आहे. या जमातीली इतर जातींना विभागण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला

बोकारो आणि धनबादसह उत्तर छोटा नागपुरात राहणाऱ्या लोकांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले, या प्रदेशात १२५ हून अधिक ओबीसी जाती आहेत.आज त्या सर्व ओबीसी म्हणून ओळखल्या जातात. हीच त्यांची ओळख आणि ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. यादव, कुर्मी महतो, तेली, कोरी, कुशवाह, नोनिया, बिंद, राजभर आणि प्रजापती कुम्हार यांच्यासह इतर ओबीसी जातींचा उल्लेख करताना म्हणाले की त्यांची एकजूट देशाच्या विकासासाठी मोठी ताकद आहे परंतु काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) त्यांना आपापसात वाटून घेण्याचा प्रयत्न करताहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, समाजात विभागणी व्हावी असं कोणालाच वाटत नाहीये. त्यामुळे एक रहेंगे तो सेफ रहेंगे.

यावेळी पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीर विधानसभेत पास करण्यात आलेल्या ३७० वापस लागू करण्यावरून काँग्रेसवर टीका केली. जगातील कोणतीच ताकद जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करू शकत नाही. रोटी, माती, आणि बेटी साठी झारखंडमध्ये एनडीएची सरकार बनली पाहिजे, असंही पंतप्रधान म्हणाले. बांगलादेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करा असं आवाहन सुद्धा पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calculator: कॅलक्युलेटरला मराठीत काय म्हणतात? कोणालाच माहित नाही

Diabetes Warning Signs: डायबेटीज रूग्णांना पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; संकेत समजून वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

SCROLL FOR NEXT