Rahul Gandhi and Mallikarjun Kharge  Saam Tv
देश विदेश

Jharkhand Election : काँग्रेसची पहिली यादी आली; 21 उमेदवार जाहीर, कुणाला कुठून मिळाली उमेदवारी? संपूर्ण यादी पाहा

Jharkhand Congress candidate list : भाजपनंतर आता काँग्रेसने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत २१ उमेदवारांची नावे आहेत. काँग्रेसने जामताडामधून इरफान अन्सारी यांना, तर रामगढमधून ममता देवी यांना तिकीट दिलं आहे.

Nandkumar Joshi

महाराष्ट्रापाठोपाठ झारखंड विधानसभा निवडणुकीचंही रण तापलं आहे. काँग्रेसने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात २१ उमेदवारांची नावे आहेत. जामताडा मतदारसंघातून इरफान अन्सारी, रामगढमधून ममता देवी, हजारीबागमधून मुन्ना सिंह, जमशेदपूर पूर्वमधून डॉ. अजय कुमार, हटियामधून अजय नाथ सहदेव, सिमडेगा येथून भूषण बारा यांना तिकीट दिलं आहे.

कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

जामताडा - डॉ. इरफान अन्सारी

जरमुंडी - बादल पत्रलेख

पौडेयाहाट - प्रदीप यादव

महागामा - दीपिका पांडेय सिंह

बडकगांव - अंबा प्रसाद

रामगढ - ममता देवी

मांडू - जयप्रकाश भाई पटेल

हजारीबाग - मुन्ना सिंह

बेरेमो - कुमार जय मंगल

झरिया - पूर्णिमा नीरज सिंह

बाघमारा - जलेश्वर महतो

जमशेदपूर पूर्व - डॉ. अजय कुमार

जमशेदपूर पश्चिम - बन्ना गुप्ता

जगन्नाथपूर - सोनाराम सिंकू

खिजरी- राजेश कच्छप

हटिया - अजयनाथ शाहदेव

मांडर - शिल्पी नेहा तिर्की

सिमडेगा - भूषण बाडा

कोलेबिरा - नमन विक्सल कोंगाडी

लोहरदगा - डॉ. रामेश्वर उरांव

मनिका - रामचंद्र सिंह

प्रतिष्ठेची निवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकाचवेळी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्राची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. तर झारखंड विधानसभा निवडणुकीत विजयासाठी भाजप पूर्ण ताकद पणाला लावणार आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीही सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे.

झारखंडमध्ये दोन टप्प्यांत मतदान

झारखंडमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला मतमोजणी असेल. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला ३८ जागांसाठी मतदान घेण्यात येईल. त्यानंतर २३ तारखेला निकाल असेल.

झारखंडमध्ये ८१ जागांसाठी निवडणूक

झारखंडमध्ये ८१ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ रोजी संपुष्टात येणार आहे. मागील विधानसभा निवडणूक ही डिसेंबर २०१९ मध्ये झाली होती.

भाजपची पहिली यादी जाहीर

भाजपने यापूर्वीच पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात ६६ उमेदवारांची नावे आहेत. माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना सरायकेलामधून उमेदवारी दिली आहे. सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चा सोडून भाजपमध्ये गेले आहेत. बाबूलाल मरांडी यांना धनवारमधून तिकीट दिले आहे.

सीता सोरेन जामताडामधून लढणार

भाजपने जामताडा येथून सीता सोरेन, कोडरमा येथे नीरा यादव, सिंदरी येथून तारा देवी, गांडेय येथून मुनिया देवी, निरसामधून अपर्णा सेनगुप्ता, झरिया येथून रागिनी सिंह, चाईसाबात गीता बलमूचू आणि छतरपूर मतदारसंघातून पुष्पा देवी यांना उमेदवारी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anil Deshmukh: 'डायरी ऑफ होम मिनिस्टर'; पुस्तकातून अनिल देशमुखांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Assembly Election: पुण्यात कारमध्ये सापडली 5 कोटींची रोकड; पोलीस, निवडणूक आयोग अधिकाऱ्यांचं मात्र मौन

Maharashtra Election : अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंना संदिप देशपांडे देणार टक्कर; वाचा मनसे उमेदवारांची यादी

Maharashtra News Live Updates: खडकवासलामधून मयुरेश वांजळे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर

Dana Cyclone Alert : 'दाना' चक्रीवादळ उडवणार दाणादाण! २ राज्यांत शाळा-कॉलेज बंद, रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT