Indian Express
देश विदेश

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Jharkhand Election Results: हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड सरकारची योजनेतून १८ ते ५० वर्षाच्या महिलांना प्रत्येक महिन्याला १ हजार रुपये दिले जातात. पूर्ण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या योजनेचा परिणाम पाहायला मिळाला. हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान या योजनेचा अघोषित चेहरा समोर आल्या.

Bharat Jadhav

Jharkhand Election Results:

झारखंडमध्ये एकदा परत इंडिया आघाडीचं सरकार बनताना दिसत आहे. सुरुवातीच्या निकालावरून राज्यातील ८१ ते ४८ जागांवर काँग्रेस -JMM च्या नेतृत्त्वाखालील इंडिया आघाडीचं सरकार बनताना दिसत आहे. तर भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए फक्त ३२ जागांवर आघाडी घेताना दिसत आहे.

भाजपने झारखंडमध्ये खूप आक्रमकपणे निवडणुकीचा प्रचार केला होता. भाजपने बांगलादेशातील घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरलं होतं. परंतु ते इंडिया आघाडीच्या मैया सन्मान योजना ला मात देऊ शकले नाही.

1. मैया सन्मान योजना

हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड सरकारच्या योजनेअंतर्गत १८ ते ५० वर्षापर्यंतच्या महिलांना प्रत्येक महिन्याला १ हजार रुपये दिले जातात. यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या योजनेचा परिणाम दिसून आला. हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन या निवडणुकीच्यादरम्यान त्या योजनेचा अघोषित चेहरा बनल्या. महिला मतदारांना आपल्या पक्षासोबत जोडण्यात त्या यशस्वी झाल्या.

तसेच इंडिया आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेत आले तर मैया सन्मान योजनेतून देण्यात येणाऱ्या पैशात वाढ करत २,५०० रुपये दिले जातील असं आश्वसन त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात जाहीर केलं होतं. जाहीरनाम्यातील हा मुद्दा महिलांपर्यंत पोहोचवण्यात कल्पना सोरेन या यशस्वी ठरल्या. या योजनेमुळे मतं अधिक मिळालीत. आदिवासी महिलांमध्ये या योजनेचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला.

2. कल्पना सोरेन यांचा जबरदस्त प्रचार

पती हेमंत सोरेन हे तुरुंगात गेल्यानंतर कल्पना सोरेन यांनी प्रत्येक सभेत भावनिक भाषणं केली. त्याच्या डोळ्यातील अश्रूंनी त्यांना विजय मिळवून दिलाय. त्यांच्या सभेत लाखोंच्या संख्येने नागरिक येत होते. त्या इंडिया आघाडीच्या स्टार प्रचारक बनून गेल्या होत्या. सभेत लोकांची गर्दी करण्यात त्या माहीर झाल्या होत्या. पती हेमंत सोरेने यांच्यापेक्षा त्या अधिकप्रमाणात लोकांना आपल्या सभेत खेचून आणण्यात यशस्वी झाल्या.

या गर्दीत तरुण आणि महिलांचा अधिक सहभाग होता. कल्पना सोरेन हिंदी भाषेसह इतर स्थानिक भाषा देखील जाणून आहेत. त्यामुळे त्या मतदारांशी जुळवून घेण्यात यशस्वी झाल्या.

3. २०० युनिट वीजबिल माफ, शेतकरी कर्जमाफी

हेमंत सोरेन सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी कल्याणकारी योजनांची घोषणा देखील त्यांनी केली. यात २०० युनिटपर्यंत वीजबिल माफ करण्यासह शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली होती. यासह हेमंत सरकारच्या सर्वजन पेन्शन योजना, सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना खूप लोकप्रिय झाल्या. सोरेन सरकारने दावा केला की, मागील ५ वर्षात झारखंडमधील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक महिन्यात साधारण १२ हजार रुपयांप्रमाणे प्रति वर्षाला १ लाख २० हजार रुपये देण्यात यशस्वी ठरले आहे.

4. आदिवासी मतदरांची साथ

भारतीय जनता पक्षानेही झारखंडमध्ये अनेक योजना सुरू करण्याच्या घोषणा केल्या होत्या. परंतु ते आदिवासी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात ते अपयशी ठरले. हेमंत सोरेन यांनी निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या अटकेचा मुद्दा नेहमी ज्वलंत ठेवला.तसेच आदिवाशी अस्मितेचा मुद्दा उचलून ठेवला. यासह आदिवासी आरक्षण सारखे मुद्द्यांवरूनही JMM- काँग्रेसच्या आघाडीने भाजपवर हल्लाबोल केला होता. मागील वेळी भाजपने आपल्या सरकारमध्ये एका गैर-आदिवासी व्यक्तीला मुख्यमंत्री बनवलं होतं. याचा परिणामाही यावेळी पाहण्यात आला.

5. कुडमी मतदारांची विभागणी

झारखंड निवडणुकीत आजसूचा प्रदर्शनही खूप वाईट राहिला. आजूस हे भाजपचा मित्रपक्ष आहे.सुरुवातीच्या निकालात भाजपचा मित्रपक्ष एकाच जागेवर आघाडीवर होती. झारखंडमध्ये कुडमी मतदारांना आजूसचा व्होटबँक मानलं जातं. यासह आजूसने जयरम महतो यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं, तरीही या पक्षापासून त्यांच्या व्होटबँक दूर गेला. कुडमी व्होटबँक विभागल्या गेल्याने इंडिया आघाडीला याचा फायदा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT