Woman Leaves Husband for Lover  AI Photo
देश विदेश

२ नातवंडांच्या आजीला म्हातारचळ; बॉयफ्रेंडच्या प्रेमात सैराट, सुनांचे दागिने घेऊन फरार

Woman Leaves Husband for Lover: ४० वर्षीय महिला बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. महिला दोन मुलांची आई आणि दोन नातवंडांची आजी असून कुटुंब हादरले.

Bhagyashree Kamble

  • ४० वर्षीय महिला प्रियकरासोबत फरार.

  • महिला २ महिलांची आई.

  • २ नातवंडांजी आजी.

उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ४० वर्षीय महिला अचानक तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. ही महिला दोन मुलांची आई आणि दोन लहान नातवंडांची आजी आहे. कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे की, ती जाताना तिच्या सुनांचे दागिने आणि रोख रक्कमही सोबत घेऊन गेली. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.

महिलेचा पती कामता प्रसाद हा सायवारी गावातील रहिवासी आहे. कामता म्हणाले की, सुमारे अडीच वर्षांपूर्वी पती आपल्या पत्नीला वीटभट्टीवर काम करायला घेऊन गेले होते. तिथे त्यांच्या पत्नीची ओळख बिहुनी गावातील रहिवासी अमर सिंह प्रजापतीशी झाली. सुरूवातीला त्यांची भेट अनौपचारिक झाली. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली.

हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली. कुटुंबाला त्यांच्या वागण्यावर संशय येऊ लागला. दोघेही कायम फोनवर बोलत असत. पतीनं महिलेला अनेकवेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघांची कायम भेट व्हायची. काही दिवसांपू्र्वी कामता मुलाच्या उपचारासाठी झाशी गेले होते.

त्याच्या पत्नीनं संधी साधली. घरातून सुमारे ४० हजार रोख, सुनांचे दागिने चोरून प्रियकरासोबत पळ काढला. यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. महिलेनं कुटुंबाला आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त केलं. यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल करून दोघांना लवकर शोधून काढण्याची मागणी केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women’s World Cup: भारत-बांग्लादेशच्या सामन्यात पावसाची जोरदार बॅटिंग; मात्र विकेट पडली पाकिस्तानची

Sun transit: 12 महिन्यांनी सूर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश; 'या' राशींच्या घरी पडेल पैशांचा पाऊस

Weekly Horoscope: या राशींचा शेअर्ससारख्या व्यवसायात मोठा फायदा होईल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके, VIDEO

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT