Jaya Kishori Income :  सोशल मीडिया
देश विदेश

नेटकरी संतापले; iPhone, ferrari मुळे जया किशोरी ट्रोल, जाणून घ्या नेमकी संपत्ती किती?

Jaya Kishori Video: कथावाचक जया किशोरी यांचे व्हिडिओ यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. त्यांच्याकडून देण्यात आलेले उपदेश लोकांना आवडतात.

Namdeo Kumbhar

Jaya Kishori Income : कथावाचक आणि मोटिव्हेशनल स्पीकर (Motivational Speaker) जया किशोरी सोशल मीडियामुळे तरुणाईमध्ये प्रसिद्ध आहेत. लोकांना त्यांचे कोट्स आणि विचार ऐकायला आवडते. जया किशोरी यांना सोशल मीडियावर (Social Media) लाखो फॉलोअर्स आहेत. वयाच्या सहाव्या वर्षांपासून त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. त्या लोकांना देवावर विश्वास ठेवण्यास आणि भ्रमापासून दूर राहण्याचा सल्ला देत असतात. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. पण एका व्हायरल व्हिडीओमुळे (Jaya Kishori Video) जया किशोरी ट्रोल होत आहेत. आपण आयफोन वापरत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. त्याशिवाय त्यांनी फेरारी गाडी घेतल्याचाही फोटो समोर आला होता. यावरुनच जया किशोरी सध्या ट्रोल होत आहेत. जया किशोरी यांची संपत्ती किती असेल? याबाबत आपण जाणून घेऊयात....

जया किशोरी व्हायरल व्हिडिओ (Jaya Kishori Viral Video)

कथावाचक जया किशोरी यांचे व्हिडिओ यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. त्यांच्याकडून देण्यात आलेले उपदेश लोकांना आवडतात. पण एका व्हिडीओमुळे जया किशोरी ट्रोल होत आहेत, त्यावर नेटकऱ्यांकडून संपात व्यक्त करण्यात येत आहे. इंग्रजीच्या शिक्षिका नीतू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. नीतू मॅडम व्हिडीओत म्हणतात, जया किशोरी प्रत्येकवेळी नवीन आयफोन खरेदी करतात. त्या एक कथावाचक आहेत. त्यांनी फेरारी खरेदी केली. मला वाटतेय मी चुकीच्या प्रोफेशनमध्ये आलेय.

त्या मिश्किल अंदाजात पुढे म्हणतात की, कथावाचकाने फेरारी विकत घेतली तर आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट नाही का? हे लोक ऐकीकडे म्हणतात कोणत्याही मोहाला बळी पडू नका, अन् स्वत फेरारी खरेदी करतात. नीतू मॅडमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी जया किशोरी यांना ट्रोल करायला सुरुवात केली. लोकांना देवाची पूजा करायला सांगतात, अन् हे लोक मोबाईल फोन अन् फेरारी सारख्या महागड्या गाड्या वापरतात.

जया किशोरी किती फी घेतात (Jaya Kishori Fees)

कथावाचक जया किशोरी लहानपणापासूनच कृष्ण भगवानची भक्ती करतात. सहाव्या वर्षांपासून त्या अध्यत्मामध्ये आहेत. त्या कथावाचन करतात, त्यासाठी लाखो रुपयांची फी (Jaya Kishori Fees) घेतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जया किशोरी एका कथावचनाच्या कार्यक्रमासाठी 9 लाख रुपये घेतात. यातील ते काही पैसे आपल्या सहकाऱ्यांना देतात, काही दान करतात.

जया किशोरी यांची नेटवर्थ (Jaya Kishori Net Worth)

मिडिया रिपोर्ट्सनुसार, जया किशोरी यांची एकूण संपत्ती (Jaya Kishori Total Net Worth) दीड ते दोन कोटी रुपये इतकी आहे. त्या एका कथावाचनाला ९ ते लाख रुपये घेतात. उत्तरभारतामध्ये जया किशोरी यांची मोठी क्रेझ आहे. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection: कांताराची दिवाळीत बंपर कमाई; लवकरच पार करणार ६०० कोटींचा टप्पा

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT