देश विदेश

Japan Moon Mission : जपानचं भारताच्या पावलावर पाऊल, SLIM लँडर चंद्राच्या दिशेने झेपावलं, पाहा VIDEO

Japan News : जपानने गुरुवारी सकाळी मून लँडरला घेऊन जाणारे यान H-IIA प्रक्षेपित केले.

प्रविण वाकचौरे

Japan Moon Mission :

इस्रोची चांद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर जगभरातून भारताचं कौतुक होत आहे. त्याचवेळी रशियाने देखील चंद्रावर आपलं Luna 25 हे यान पाठवलं होतं. मात्र रशियाची ही मोहीम अपयशी ठरली आहे. आता जपानने चंद्राच्या दिशेने स्वारी केली आहे.

जपानने गुरुवारी सकाळी मून लँडरला घेऊन जाणारे यान H-IIA प्रक्षेपित केले. खराब हवामानामुळे मागील महिन्यात तीन वेळा हे मिशन स्थगित करण्यात आलं होतं. मात्र आज जपानचं यान चंद्राच्या दिशेने झेपावलं आहे. (Latest Marathi News)

जपान दीर्घकाळापासून आपल्या चंद्र मोहिमेवर काम करत आहे. जपानच्या चंद्र मोहिमेत अनेक गोष्टींचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत स्मार्ट लँडर (SLIM) चंद्रावर तपासणीसाठी उतरवावे लागेल. जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) 'H2A रॉकेट'द्वारे चंद्रावर पाठवत आहे.

जपानचा SLIM प्रोजेक्ट मून स्निपर म्हणून ओळखला जातो. यामध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात हाय टेक कॅमेरे आहेत, जे चंद्राला समजून घेण्याचे काम करतील. पुढील वर्षाच्या सुरुवातीला SLIM चे चंद्रावर उतरण्याचे नियोजन आहे.

इस्रोने (ISRO Full Form) देखील जपानच्या अंतराळ संस्थेचं अभिनंदन केलं आहे. इस्रोने ट्वीट करत म्हटलं की, 'चंद्रच्या दिशेने SLIM लँडरच्या यशस्वी प्रक्षेपणाबाबत अभिनंदन @JAXA_en . ग्लोबल स्पेस कम्युनिटीकडून चंद्राच्या आणखी एका यशस्वी प्रयत्नासाठी शुभेच्छा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

SCROLL FOR NEXT