ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
31st डिसेंबरची पार्टी खास आणि लक्षात राहणारी असावी यासाठी मेन्यूमध्ये आकर्षक, चविष्ट आणि सर्वांना आवडणाऱ्या डिशेस असणे खूप महत्त्वाचे असते.
पनीर टिक्का हि डिश स्टार्टर म्हणून एकदम परफेक्ट आहे. हेल्दी आणि टेस्टी पनीर टिक्का तुम्ही मिंट चटणीसोबत खाऊ शकता.
पातळ कापलेल्या भाज्या कॉर्नफ्लोअरमध्ये कोट करून डीप फ्राय केल्या जातात आणि त्यापासून कुरकुरीत व्हेज क्रिस्पी बनवली जाते. व्हेज क्रिस्पी हा चायनीज फ्लेवर स्टार्टर आहे जो खासकरुन पार्टीत लोकप्रिय आहे.
चीज पोटॅटो बॉल्स हे बटाटे आणि चीजपासून बनवलेला कुरकुरीत पदार्थ आहे.बाहेरून खमंग आणि आतून मऊ चीज असल्यामुळे हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.
व्हाइट सॉस पास्ता हा थोडा हेवी पण खूपच चविष्ट असा पदार्थ आहे. क्रीम, चीज आणि रंगीत भाज्यांमुळे पास्ता दिसायलाही आकर्षक दिसतो. त्यामुळे पार्टीत मेन कोर्समध्ये या डिशचा समावेश जास्त केला जातो.
रंगीत भाज्या, सोया सॉस आणि मसाल्यांनी तयार केलेला फ्राइड राईस सर्वांनाच भरपूर आवडतो. कमी वेळात झटपट बनवला जातो.
भाज्यांचे बॉल्स तयार केले जातात आणि ते ग्रेवीमध्ये मिक्स केले जातात. व्हेज मंचुरियन ही पार्टी मेन्यूमधील सुपरहिट डिश मानली जाते.