Non-smoking employees rewarded with extra paid leaves under a unique workplace policy in Japan. saam tv
देश विदेश

नोकरदारांना 'सुट्ट्यांची' लॉटरी, सिगारेट सोडा, ६ सुट्ट्या मिळवा

ऑफिसमध्ये सिगारेट ओढणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आपल्याला जास्त काम करावं लागतंय, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे केली. त्यानंतर या तक्रारीवर कंपनीनं चक्क 'नो स्मोकिंग'चा फॉर्म्युला शोधून काढलाय. नेमका हे प्रकरण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे, हा धोका माहित असतानाही अनेक जण धुम्रपान करताना दिसतात.. मात्र, एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना धूम्रपानापासून दूर ठेवण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे... जे कर्मचारी सिगारेट ओढत नाहीत त्या कर्मचाऱ्यांना चक्क वर्षाला 6 अतिरिक्त पगारी सुट्ट्या देण्याचा निर्णय या कंपनीने घेतलाय... सोशल मीडियावप या अनोख्या आणि कौतुकास्पद निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.... कोणत्या कंपनीने हा भन्नाट निर्णय घेतलाय, आणि कंपनीची ही नो स्मोकिंग पॉलिसी नेमकी काय आहे पाहूयात...

2017 साली सुरू झालेल्या जपानच्या पियाला या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना धुम्रपानापासून दूर ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. 'जे कर्मचारी सिगारेट ओढतात, ते दिवसातून अनेक वेळा ‘स्मोकिंग ब्रेक’ घेतात. यामुळे त्यांच्या कामाचा वेळ वाया जातो आणि त्यांच्या वाट्याचं काम इतर कर्मचाऱ्यांवर पडते. तसंच, जे सिगारेट ओढत नाहीत, त्यांना असा कोणताही अतिरिक्त ब्रेक मिळत नाही, अशी तक्रार करण्यात आली... ही तक्रार कंपनी व्यवस्थापनाने अत्यंत गांभीर्याने घेतली आणि थेट कर्मचाऱ्यांमध्ये एक अंतर्गत सर्व्हे घेतला... या सर्व्हेनंतर कंपनीचे सीईओ ताकाओ असुका यांनी जे कर्मचारी धूम्रपान करत नाहीत त्यांना वर्षाला 6 अतिरिक्त सुट्ट्या देण्याचा निर्णय जाहीर केला...

तज्ज्ञांच्या मते, वारंवार स्मोकिंग ब्रेक घेतल्याने कंपनीच्या उत्पादकतेवर म्हणजेच 'प्रॉडक्टिव्हिटी'वर मोठा परिणाम होतो. त्यामुळे जपानच्या या पॅटर्ननं आता जगभरातील कॉर्पोरेट क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलंय. इतकंच नव्हे तर अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निरोगी ठेवण्यासाठी फिटनेस बोनस आणि हेल्थ गोल्स अशा ऑफर्स देण्यास सुरुवात केलीये. अशातच आता जपानमधील हा पॅटर्न पाहता, आता भारतातील कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी अशी पावलं उचलणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: आरसीबीसमोर गुजरातचं १५६ धावांचं आव्हान

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वारे आणि पावसाला सुरुवात

गिल झेलबाद होताच कोहलीचा जोश हाय; पाटीदारच्या अप्रतिम झेलवर विराटचं जबरदस्त सेलिब्रेशन

खळबळजनक! बँक कर्मचाऱ्यांकडून ८० तोळे लंपास, ८ ग्राहकांचे लॉकर फोडले

राज्यात IT क्षेत्रात खळबळ, पुण्यात रातोरात बड्या कंपनीला टाळं

SCROLL FOR NEXT