Pappu Yadav Accident
Pappu Yadav Accident 
देश विदेश

Pappu Yadav Accident : पप्पू यादव यांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात, 2 कार चक्काचूर, 11 नेते जखमी

वृत्तसंस्था

Pappu Yadav Accident News : जनाधिकारी पक्षाचे (जेएपी) नेते आणि माजी खासदार पप्पू यादव यांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा हा भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की पप्पू यादव यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पथकाची गाडी पलटी झाली.

या अपघातात (Accident) दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. यापैकी एका गाडीत जेएपी नेते होते, तर दुसऱ्यामध्ये सुरक्षा रक्षक होते. या भीषण अपघातात पप्पू यादव थोडक्यात बचावले आहे. मात्र, त्यांच्या ताफ्यासोबत असलेले ११ नेते या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे.

हा अपघात सोमवारी रात्री उशिरा ब्रह्मपूर फोरलेनवर आरा आणि बक्सर दरम्यान घडला. पप्पू यादव सारण जिल्ह्यातून परतत होते. मुबारकपूर घटनेतील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी ते आला होते. परतत असताना रात्री उशिरा आरा-बक्सर दरम्यान ब्रह्मपूर फोरलेनवर त्यांच्या ताफ्याचा भीषण अपघात झाला.

ट्रकने ओव्हरटेक केल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रक ओव्हरटेक केल्याने अनेक वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात पप्पू यादव यांच्या सुरक्षेत तैनात असलेले अनेक जवानही गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर पप्पू यादव यांनी जेएपीचे बक्सर जिल्हाध्यक्ष सुनील कुमार आणि नेते अभियंता दिनेश कुमार यांचे हात तुटल्याचे सांगितले. काहींच्या छातीवर खूप जखमा आहेत, तर काहींच्या डोक्याला मर लागला आहे. या अपघातात बीएमपीचे दोन जवानही जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ebrahim Raisi : मोठी बातमी! इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

Loksabha Election 2024: अक्षय कुमार, जान्हवी कपूरसोबत अनेक सेलिब्रिंटीनी केलं मतदान, चाहत्यांनाही केलं आवाहन

Mumbai South Election Voting LIVE : महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी सहकुटुंब केले मतदान

Lok Sabha Election Voting 2024: राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएम बंद, मतदानासाठी आलेल्या नागरिकांचा खोळंबा

Rahul Gandhi News | 8 वेळा मतदान केल्याचा तरुणाचा दावा, राहुल गांधींकडून Video Share

SCROLL FOR NEXT