SONAM WANGCHUK HUNGER STRIKE DAY 22 | CJP PARLIAMENT MARCH SPARKS TENSION IN DELHI  Saam Tv
देश विदेश

CJP Protest : जंतर मंतरवर CJP च्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, 3KM पर्यंत नेटवर्कच नाही; आंदोलनाचा VIDEO समोर

Delhi Jantar Mantar CJP Protest Update : जंतर मंतरवरील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा २२ वा दिवस सुरू असताना CJP समर्थकांनी संसदेकडे मोर्चा काढला. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला असून लाठी चार्ज करण्यात आला.

Alisha Khedekar

  • सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज २२ वा दिवस

  • CJP प्रमुख अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली हजारो समर्थक संसदेकडे मोर्चा घेऊन निघाले

  • दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात

  • आंदोलनस्थळी गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांवर लाठी चार्ज

महाराष्ट्रातील नीट पेपर फुटी प्रकरणानंतर दिल्ली येथील जंतर मंतरवरती गेल्या काही दिवसांपासून CJP चे प्रमुख अभिजित दिपके आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आहेत. वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा २२ वा दिवस असून हजारोंच्या संख्येने CJP समर्थक जंतर मंतरवर धडकले आहेत. हा मोर्चा आज संसदेच्या दिशेने जाणार आहे. या दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या मोर्चा दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं समोर आलं आहे. आता हा मोर्चा कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

वांगचुक उपोषण मागे घेणार

शनिवारी १८ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना जंतर मंतरवरील आंदोलनच्या ठिकाणावरून हटवलं आणि त्यांची प्रकृती खालावल्याने दिल्ली येथील सफरदगंज रुग्णालयात दाखल केले. मात्र अद्यापही वांगचुक त्यांच्या उपोषणावर ठाम असून त्यांनी सरकारला पत्र लिहत आपल्या तीन अटी सांगितल्या. या तीन अटी मान्य केल्यास वांगचुक यांनी उपोषण सोडण्याची ग्वाही दिली.

आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे CJP प्रमुख अभिजित दिपकेसह जंतर मंतरवर जमलेले अनेक CJP समर्थक संसदेच्या दिशेने मोर्चा घेऊन निघाले आहेत. दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली नसतानाही आंदोलकांनी परिसरात गोंधळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर कलम १६३ लागू करण्यात आला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नकार दिल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला.

आंदोलनस्थळी नेटवर्कच नाही

पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. ५,००० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी संसदेकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले असून, विविध ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. परिसरातील ५ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत, तसेच आंदोलनस्थळी जॅमर लावण्यात आले आहेत. दरम्यान आता CJP ला सरकारकडे न्याय मागण्यात यश येणार का? धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : मुघलांना सलग ६ वर्षे रोखणारा मराठ्यांचा अभेद्य किल्ला, नाशिकमधील 'या' किल्ल्याचा इतिहास वाचून अभिमान वाटेल!

CJP protest : मुलींचे कपडे फाडले, छातीवर पाय देऊन मारलं; अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप, आज पुन्हा संसद मार्च

१ नाही, २ नाही तब्बल ६ भाषांमध्ये एकाच वेळी 'बिग बॉस' सुरू होणार, सलमान खान गाजवणार हिंदी Bigg Boss

Maharashtra News Live Update: नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट

पोलिसांकडूनच आंदोलक विद्यार्थ्यांवर दगडफेक; व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद, पाहा धक्कादायक दृश्य

SCROLL FOR NEXT