Cricketer Death Saam Tv
देश विदेश

Cricketer Death: दुचाकीवरून जाणाऱ्या क्रिकेटरचा दुर्दैवी मृत्यू, चालकाने कारचा दरवाज उघडला अन्...; अपघाताचा थरारक VIDEO

Road Accident Viral Video: जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात स्थानिक क्रिकेटपटू फरीद हुसेन याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. कारचा दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकीस्वार फरीदचा जागीच मृत्यू झाला.

Manasvi Choudhary

जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातून अत्यंत दु:खदायक घटना समोर येत आहे. एका स्थानिक क्रिकेटपटूचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्यावर एका व्यक्तीने अचानक कारचा दरवाजा उघडल्याने दुचाकीस्वार क्रिकेटपटूची धडक बसल्याने हा अपघात झाला. दरम्यान क्रिकेटपटू रस्त्यातच जमिनीवर पडला आणि गंभीर जखमी झाला. यात त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने सर्वानाच धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या क्रिकेटरचे नाव फरीद हुसेन आहे. फरीद हुसेन हा दुचाकीवरून जात होता. याचवेळी एका कारमधून व्यक्ती बाहेर पडणार तेवढ्यातच त्याची धडक फरीदला बसली अन् फरीद रस्त्यावर खाली पडला. सीसीटीव्हीच्या माहितीनुसार, वर्दळीच्या रस्त्यावर एका सामान्य व्यक्तीने त्याची कार थांबवली होती तो कारमधून उतरणार तेवढ्यात दुचाकीवरून क्रिकेटर फरीद हुसेन जात होता. याच दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या कारचा दरवाजा उघडला असा फरीदला जबर धक्का बसला तो कारच्या दरवाजाला धडकला अन् जमिनीवर पडला. दरम्यान तेथील लोक त्याच्या मदतीसाठी धावले पण फरीदचा जागीच मृत्यू झाला.

रस्त्यावर वाहन चालवण्याचे नियम न पाळल्याने असे अपघात होतात. व्यक्तीने जर योग्य खबरदारी घेत दरवाजा उघडला असता तर हे संकट टळले असते. फरीदच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वानाच धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात अजून एक विषारी दारूचा बळी

Marriage tips : मुलगा कितीही श्रीमंत असला तरी 'या' १ सवयीमुळे मुलीचं आयुष्य होईल उद्ध्वस्त; लग्नाआधीच व्हा सावधान

PSI Transfer : महाराष्ट्रात बदल्यांचा धडाका! ४३ PSI सह ३९९ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

भाजप सरकारमध्ये मोठा फेरबदल होणार; कोणाकोणाला मिळणार डच्चू?

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

SCROLL FOR NEXT