Jammu Kashmir Voting Counting  Saam Tv
देश विदेश

Jammu Kashmir Assembly: विधानसभा निवडणुकीसाठी मतदान जम्मू-काश्मीरमध्ये, पण मतमोजणी दिल्लीत, नेमकं कारण काय?

Jammu Kashmir Voting Counting : जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. या निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Priya More

जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जम्मू काश्मीरमधील सर्वच राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जम्मू-काश्मीरच्या विधानसभेच्या ९० जागांसाठी १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान झाले. केंद्रशासित प्रदेशाच्या निर्मितीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत यावेळी एकूण ६३.८८ टक्के मतदान झाले होते. कलम ३७० हटवल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. महत्वाचे म्हणजे जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या मतमोजणीसाठी दिल्लीत केंद्रे स्थापन करण्यात आली असून दिल्लीत मतमोजणी होत आहे. मतदान जम्मू-काश्मीरमध्ये तर मतमोजणी दिल्लीमध्ये असे का? यामागचे कारण आपण जाणून घेणार आहोत...

जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी दिल्लीत मतमोजणी का? केली जात आहे असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. तर विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मतांची मोजणी करण्यासाठी दिल्लीत मतमोजणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय काश्मीर पंडितांच्या मतांची मोजणी करण्यासाठी दिल्लीशिवाय जम्मू आणि उधमपूरमध्येही मतमोजणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. १९९० मध्ये काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर सुमारे ३.५ लाख काश्मिरी पंडितांना आपले घर सोडावे लागले होते. आता या पंडितांच्या पुनर्वसनासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

यापूर्वी काश्मिरी पंडितांसाठी दिल्लीतही मतदान केंद्रे करण्यात आली होती आणि काश्मिरी पंडितांनी उत्साहाने मतदान केले होते. यावेळी जवळपास ३४ टक्के काश्मिरी पंडितांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. दुसऱ्या टप्प्यात काश्मिरी पंडितांनी सर्वाधिक मतदान केले होते.दुसऱ्या टप्प्यात ४० टक्के काश्मिरी पंडितांनी मतदान केले. याशिवाय पहिल्या टप्प्यात ३१ टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात ३० टक्के काश्मिरी पंडितांनी मतदान केले.

जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक महत्वाची यासाठी आहे कारण कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका झाल्या. कलम ३७० रद्द केल्यापासून जम्मू-काश्मीरच्या राजकीय परिस्थितीत मोठे बदल दिसून येत आहेत आणि आता आज जम्मू-काश्मीरमध्ये कोणाची सत्ता येईल हे चित्र आज स्पष्ट होईल. या निवडणुकांचे निकाल या नव्या राजकीय युगाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. केंद्रशासित प्रदेशाच्या निर्मितीनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत एकूण 873 उमेदवारांनी नशीब आजमावले आहे. जनतेच्या निर्णयाचा निकाल आज येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: बिग बॉस १९ ने केली टॉप ९ स्पर्धकांची घोषणा; या आठवड्यात कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता

Maharashtra Live News Update: बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पाहिलं नाही- राज ठाकरेंची पोस्ट

Shocking: नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं संपवलं आयुष्य, हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये घेतला गळफास

Rumali Roti : घरच्या घरी बनवा रेस्टॉरेंट सारखी रुमाली रोटी

Ladki Bahin Yojana: निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार! सरकार २ महत्त्वाचे निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT