Jammu Kashmir Encounter Saam Tv
देश विदेश

Indian Army : जम्मू काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई, ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Indian Army Kills 3 Jaish Terrorists in J&K : जम्मू-काश्मीरमधील त्रालमध्ये भारतीय लष्कराने कारवाई करत तीन जैश-ए-मोहम्मद दहशतवाद्यांचा खात्मा केला. परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असून चकमक चालू आहे.

Namdeo Kumbhar

Tral Encounter Latest News : जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी पुन्हा एकदा हाणून पाडला. पुलवामामधील त्राल येथे तीन दहशतवाद्यांनी भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भरतीय जवानांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

जम्मू-काश्मीरमधील त्राल येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळपासून चकमक सुरू आहे. भारतीय लष्कराने ३ दहशतवाद्यांना यमसदनी पाठवल्याची माहिती समोर आली आहे. आज तक याबाबतचे वृत्त दिले आहे. गुप्तचर संस्थेकडून भारतीय लष्कराला त्रालमध्ये दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. भारतीय लष्कराने सर्च ऑपरेशन केले असता दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैन्याला यश आले आहे.

त्रालच्या नदर गावात ही कारवाई सुरू आहे. परिसरात जैश-ए-मोहम्मदचे दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. गेल्या ४८ तासांत पुलवामामधील ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी मंगळवारी शोपियाँमध्ये लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले होते. शोपियाँमधील विशेष ऑपरेशन अंतर्गत सुरक्षा दलांनी जिनपथेर केलर परिसरात या दहशतवाद्यांना घेरले होते. या कारवाईला ‘ऑपरेशन केलर’ असे नाव देण्यात आले होते. सुरक्षा दल सतर्क असून परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

भारतीय लष्कराने ट्वीट केले, १५ मे २०२५ रोजी, गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि श्रीनगर सेक्टर सीआरपीएफ यांनी अवंतीपोराच्या त्राल येथील नदर येथे सर्च आणि कॉर्डन ऑपरेशन सुरू केले. सतर्क सैनिकांनी संशयास्पद हालचाली पाहण्यात आल्या. दहशतवाद्यांनी फायरिंग केल्यानंतर लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. चकमक सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT