जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ल्याची शक्यता; देशातील एजन्सीज् हाय अलर्टवर  Saam Tv
देश विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ल्याची शक्यता; देशातील एजन्सीज् हाय अलर्टवर

तालिबान्यांनी अफगाणिस्तानची सत्ता बळकावल्यानंतर भारताच्या सीमेपलीकडे देखील दहशतवाद्यांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : तालिबान्यांनी Taliban अफगाणिस्तानची Afghanistan सत्ता बळकावल्यानंतर भारताच्या सीमेपलीकडे Indian Border देखील दहशतवाद्यांच्या हालचाली Terrorist Attack मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गुप्तचर संस्थाकडे एक मोठा धोका म्हणून बघत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेच्या दिलेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये वाढ झाल्याची माहिती मिळाल्यानंतर देशाच्या गुप्तचर संस्थांनी जम्मू -काश्मीर मधील Jammu-Kashmir दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एका अधिकृत सूत्राच्या दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये कंधार याठिकाणी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश- ए- मोहम्मद JEM चे नेते आणि तालिबान नेते यांच्यामध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीत ही माहिती मिळाल्यानंतर सर्व गुप्तचर यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालिबान नेत्यांचा एक गट या बैठकी मध्ये सहभागी झाला होता. या बैठकीत जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतावर हल्ले करण्याकरिता तालिबानचा समर्थन मागितले आहे.

हे देखील पहा-

पाकिस्तान मधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. अधिकारी म्हणाले- आम्ही गुप्तचर संस्थांना सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिले आहे. 24 ऑगस्ट दिवशी पाकिस्तान मधून २ दहशतवाद्यांच्या हालचालीबाबत आम्हाला गुप्तचर माहिती मिळाली आहे. हे दहशतवादी श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्याची योजना आखत असल्याचे दिसून आले आहे. सर्व संबंधित यंत्रणांना आपापसात माहिती शेअर करत राहण्याकरिता अलर्ट जारी करण्यात आले आहे.

सध्या, सर्व राज्ये आणि केंद्राच्या दहशतवाद विरोधी युनिट्सला हाय अलर्ट करण्यात आले आहे. 5 ऑगस्ट दिवशी तालिबानी दहशतवादी काबूलमध्ये घुसखोरी केली. ज्यामुळे नागरी सरकार पाडले गेले. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अफगाण लोकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण पसरले आहे. काबुल विमानतळावर हजारो अफगाण नागरिक देश सोडून जाण्याकरिता जमले आहेत. हजारो लोक सीमा ओलांडून शेजारच्या देशांमध्ये गेले आहेत.

दरम्यान, गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर हजारोंच्या गर्दीत आत्मघातकी बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत . या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 13 अमेरिकन सैनिक आणि किमान 169 अफगाण नागरिक मारण्यात आले आहेत. काबुल विमानतळाबाहेर झालेल्या साखळी स्फोटाअगोदर अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासह सर्व देशांनी अशा मोठ्या हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला होता. अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना विमानतळापासून दूर राहण्याच्या सूचना सॆन्यात आले आहेत.

हे लक्षात घेण्यासारखे आहे, की काबूल विमानतळाबाहेर सुरक्षेची जबाबदारी तालिबानवर होती. तालिबानी लढाऊही ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. असे असून देखील, दहशतवादी हल्ला थांबवता आला नाही आणि मोठ्या संख्येने निष्पाप लोक मारले जात आहेत. यामुळेच आता हल्ल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर भारतीय एजन्सींसुद्धा अलर्ट वर राहणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT