Jammu Kashmir Terrorist Attack Saam Digital
देश विदेश

Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एका दहशतवाद्याला घातलं कंठस्नान

Jammu Kashmir Attack : जम्मू-काश्मीरमधील कठुआ हिरानगर येथे गोळीबार झाल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिांना दिली होती. त्यांनंतर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.

Sandeep Gawade

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील हिरानगर येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. गोळीबार झाल्याची माहिती सैदा सुखल ग्रामस्थांनी दिली होती, त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाममध्ये चकमक झाली यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलं आहे. चकमकीच्या काही वेळापूर्वी गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली होती.

रविवारी जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात भाविकांनी भरलेल्या बसवर दहशदवाद्यांनी हल्ला केला होता. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला तर 41 जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर बस दरीत कोसळली होती. तरीही दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरूच ठेवला. या हल्ल्यात जखमी झालेल्या 41 जणांपैकी 10 जणांना गोळ्या लागल्या होत्या. त्यातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे आहेत. यासाठी सुरक्षा दलाची 11 पथके कार्यरत आहेत. पोनी तेरायथ परिसराला सर्व बाजूंनी वेढा घालण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा या घटनेचा तपास करत असून २० हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

राजौरी आणि रियासीच्या डोंगराळ भागात पाकिस्तानी दहशतवादी लपून बसल्याचा सुरक्षा दलांना संशय असून त्यांनी या भागात शोधमोहीम तीव्र केली आहे. या हल्ल्यामागे कोण आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एनआयएच्या पथकाने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी हल्ल्याच्या ठिकाणाची पाहणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT