Pahalgam Terror Attack Pahalgam Mastermind Pakistani Commando Saam Tv News
देश विदेश

Pahalgam Attack : पहलगामचा मास्टरमाईंड पाकिस्तानचा कमांडो; हल्ल्यात पाक लष्कराचा हात; लष्करानं ठरवलं, पहलगाम घडवलं

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात थेट पाकिस्तानी सैन्याचं कनेक्शन समोर आलंय.. मात्र कोण आहे या हल्ल्याचा मास्टरमाईंड? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Prashant Patil

नवी दिल्ली : पहेलगाम हल्ला भारतीयांच्या जिव्हारी लागलाय...ज्या क्षणी हल्ला झाला त्यानंतर तपास यंत्रणांनी वेगानं सूत्र फिरवली. त्यावेळी काश्मीर ताब्यात घेण्याची धमकी देणार सैफुल्ला कसुरी हा पहलगाम हल्ल्याचा मास्टमाईंड असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं. दरम्यान पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केच लष्कराकडून जारी करण्यात आलं. त्यानंतर आता पहलगाम हल्ला घडवणारा खरा मास्टरमाईंड समोर आलाय. या मास्टरमाईंडच नाव आहे... हाशिम मुसा...कोण आहे हाशिम मुसा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून..

कोण आहे हाशिम मुसा?

पाकिस्तानच्या एसएसजीचा माजी कमांडो

पाक लष्करानं मुसाला स्पेशल फोर्समध्ये पाठवलं

सध्या लष्कर-ए- तैयबासाठी कार्यरत

मुसाकडे हाय रिस्क ऑपरेशनची जबाबदारी

एसएसजीचा पॅरा-कमांडो मुसा गुप्त कारवायांमध्ये माहिर

मुसाचा ऑक्टोबर 2024 मध्ये काश्मीरच्या गांदरबलमध्ये हल्ला

दहशतवादी हाशिम मुसानं याआधीही जम्मू काश्मीरच्या गांदरबल आणि बारामुल्लात दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यातील जुनैद अहमद भट आणि अरबाज मीर या दोन स्थानिकांना मुसाने पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण दिल्याचं ही आता समोर आलयं. हाशिम मुसा हाच पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंड असल्याचं समोर आल्यानं पाकड्यांचा बुरखा टराटरा फाटलाय. त्यामुळे निष्पापांचे बळी घेणाऱ्या मुसा सारख्या दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्याची आता गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT