जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण सीमेरेषेजवळ असलेल्या गावात भूसुरूंगाचा स्फोट झाला. यात सहा जवान जखमी झालेत. सकाळी जवान गस्ती घालत होते, त्याचवेळी विस्फोट झाला. हा विस्फोट सकाळी १०.४५ वाजता झाला. नौशेराच्या सेक्टरमध्ये खंबा किल्ल्याजवळ लावण्यात आलेल्या भूसुरुंगावर चुकून एका जवानाचा पाय पडला. त्याकारणाने विस्फोट झाला असून यात सहा जवान जखमी झालेत.
जखमींना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घुसखोरी थांबवण्यासाठी नियंत्रण सीमेरेषेजवळील भागात भूसुरूंग लावण्यात आलेत. दरम्यान पावसामुळे हे सुरूंग वाहून जात असतात, त्यामुळे अशा दुर्घटना घडत असतात. हा विस्फोट भवानी सेक्टरच्या मकडी परिसरात झाला. यात विस्फोटात ६ जवान जखमी झालेत.
जखमी जवानांना आता राजौरी येथील आर्मी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याआधी ९ डिसेंबर २०२४ रोजी जम्मूच्या पूंछमध्ये अशाच विस्फोट झाला होता, यात एक जवान शहीद झाला होता. लष्काराचे प्रवक्ते म्हणाले की, २५ राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार वी. सुब्बैया वरिकुंटा हे पुंछच्या चौकीच्या टेकरीवर गस्त घातल होते, त्यावेळी एका भूसुरुंगाचा विस्फोट झाला होता त्यात एका जवानाचा मृत्यू झाला होता.
जवानाच्या कुटुंबियांच्या दुःखात प्रती आपल्या संवेदना आहेत. दुःखाच्या या वेळी आम्ही त्यांच्या सोबत आहोत. याचदरम्यान बारामुल्ला जिल्ह्याच्या पट्टन पलहन परिसरात एक आयईडीला निष्क्रित करण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.