Jammu Kashmir DG Prison Hemant K Lohia  ANI
देश विदेश

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीर हादरलं! पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या

काश्मीरचे (Jammu Kashmir) पोलीस तुरूंग महासंचालक हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. जम्मू-काश्मीरचे (Jammu Kashmir) पोलीस तुरूंग महासंचालक हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. सोमवारी (3 ऑक्टोबर) रोजी ही घटना घडली. या घटनेने सुरक्षा यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. (Jammu Kashmir DG Prison Hemant K Lohia)

हेमंत यांच्या हत्येमागे त्यांचा मदतनीसाचा हात असल्याचा संशय पोलिसांना (Police) आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हेमंत लोहिया हे 1992 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सोमवारी त्यांचा मृतदेह त्यांच्या निवास्थानी आढळून आला.

लोहिया यांच्या शरीरावर चाकूने वार करण्यात असल्याचे आढळून आले आहे. तसेच त्यांच्या पायाला तेल लावले असल्याचे आढळून आले. त्यांचा पाय काहीसा सुजला होता. मारेकऱ्याने लोहिया यांना गुदमरून ठार केले. त्यानंतर केचअपच्या बॉटलच्या काचेच्या तुकड्याने त्यांचा गळा चिरला.

गळा चिरल्यानंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लोहिया यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

लोहिया यांची हत्या त्यांच्याच मदतनीसाने केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. सध्या त्यांचा मदतनीस हा बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पोलीस महासंचालकांचीच गळा चिरून हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT