देश विदेश

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरमध्ये अजित पवार गटाची आघाडी; निवडणूक जाहीर होताच केली उमेदवारांची घोषणा

jammu- Kashmir Assembly Election: अजित पवार गट पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर करून टाकलीय.

Bharat Jadhav

अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक लढणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रवादी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुक लढवणार आहे. निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू- काश्मीरमध्ये हालचाली सुरू केल्यात. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २५ स्टार प्रचारकांची घोषणा केलीय.

निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं ठरवलंय. इतकेच पक्षाकडून तीन उमेदवारांची घोषणादेखील करण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू-काश्मीरचे प्रभारी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली.

पक्षाच्या संसदीय मंडळाने पुलवामा जिल्ह्यात निवडणूक लढवण्यासाठी तीन उमेदवारांच्या नावांना मान्यता दिलीय . त्राल मतदारसंघातून मोहम्मद युसूफ हजम, पुलवामा विधानसभा क्षेत्रातून इश्तियाक अहमद शेख आणि राजपुरा विधानसभेसाठी घड्याळाच्या चिन्हावर अरुण कुमार रैना यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रचार करणाऱ्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी ही माहिती दिलीय. प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी जाहीर केलेल्या यादीत पक्षाच्या २५ प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. असून या भागातील निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. या यादीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यासह महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, एस. आर. कोहली, ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि जम्मू आणि काश्मीर प्रदेशाध्यक्ष डॉ. तारिक रसूल आदी प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

SCROLL FOR NEXT