Jammu National Highway Bus Accident ANI
देश विदेश

Jammu Bus Accident: जम्मूच्या अखनूरमध्ये भीषण अपघात; १५०फूट खोल दरीत कोसळली भाविकांची बस, २१ जणांचा मृत्यू

Jammu National Highway Accident News: जम्मू-काश्मीरला जाणारी प्रवाशांनी भरलेली बस राष्ट्रीय महामार्गावरून घसरून दरीत कोसळलीय. अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे.

Bharat Jadhav

जम्मूच्या अखनूरमध्ये गुरुवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. जम्मू-पुच्छ महामार्गावरील अखनूर येथील तांडा वळणावरील दीडशे फूट खोल दरीत बस कोसळली. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४० जण गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस उत्तर प्रदेशातील हाथरस येथून जम्मूला जात होती. या बसमधून सुमारे ५० ते ६० जण प्रवास करत होते

अपघात झाल्यानंतर घटनास्थळी बचाव कार्यसाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली. प्रवाशांनी भरलेली बस उत्तर प्रदेशातील हाथरस येथून जम्मूतील शिव खोडी येथे जात होती. त्यावेळी बस अखनूर येथील तांडा या वळणार आली असताना खोल दरीत कोसळली. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना अखनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मूच्या उपायुक्तांनी सांगितले की, हाथरस येथून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला जम्मूच्या अखनूरमधील तांडाजवळ अपघात झाला. या घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. लोकांचा आरडाओरडा सुरू झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले.

पोलीस, नागरिक आणि एसडीआरएफ, एनडीआरएफने तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना अखनूर येथील स्थानिक रुग्णालयात आणि जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

SCROLL FOR NEXT