Pakistan Attack On Jammu  Saam Tv News
देश विदेश

Pakistan Attack On Jammu : भारत-पाकिस्तान युद्ध पुन्हा पेटलं! जम्मूत ब्लॅकआऊट, पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; भारताने प्लॅन हाणून पाडला

Pakistan Drone Attack on Jammu Kashmir : गुरुवारी रात्रीच्या वेळी भारताच्या हद्दीतील जम्मू शहरात पाकिस्तानच्या ड्रोनचा हल्ला सुरू झाला. त्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आणि सायरन वाजवून लोकांना सावध करण्यात आलं.

Prashant Patil

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढला असून पाकिस्तानने जम्मूवर ड्रोन हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर पूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आहे. भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी रात्रीच्या वेळी भारताच्या हद्दीतील जम्मू शहरात पाकिस्तानच्या ड्रोनचा हल्ला सुरू झाला. त्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आणि सायरन वाजवून लोकांना सावध करण्यात आलं. त्यानंतर या प्रदेशाचा ताबा लष्कराने घेतला. दरम्यान, भारताची डिफेन्स सिस्टिम एस ४०० सक्रिय झाली आणि त्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोनला हवेतच लक्ष्य केलं. पाकिस्तानच्या दहशतवादाला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आणि नऊ ठिकाणी हल्ला करून दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली.

त्याचदरम्यान, आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. एअरपोर्टवर हल्ल्याचा आवाज आल्याने सगळीकडे ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. हवाई हद्दीत ड्रोन दिसल्याने लष्कर अलर्ट मोडवर आलं आहे. सतवारी कॅम्पसमध्ये हा हल्ल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पठाणकोट आणि पुंछमध्ये सायरनचा आवाज देण्यात आला आहे. पंजाबच्या गुरुदासपूर आणि राजस्थानच्या सीमेलगतच्या भागावर ब्लॅकआऊट करण्यात आलेला आहे. भारताच्या S-400 ने पाकिस्तानचे ८ मिसाईल पाडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT