jammu bantalab  Saam tv
देश विदेश

निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळला; 6 मजूर दबले, बचाव कार्य सुरू

jammu bantalab latest news : निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळल्याची घटना घडली. यात 6 मजूर दबले.

Vishal Gangurde

जम्मू बंटलाबमध्ये पुलाचा भाग कोसळला

पुलाच्या ढिगाऱ्याखाली मजूर दबले

मजुरांना बाहेर काढण्याचे कार्य सुरू

जम्मूच्या बंटलाबच्या ठर भागात शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. एक पुलाच्या विस्ताराचं काम सुरू होतं. त्याचवेळी दुर्घटना घडून ६ मजूर ढिगाऱ्याखाली दबल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक मजुरांच्या मदतीला धावून अभियान सुरू केलं.

जम्मू काश्मीर पोलीस, एसडीआरएफ, भारतीय सेना आणि स्थानिक लोकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. आतापर्यंत २ मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. तर ४ मजूर ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना काढण्याचे काम सुरू आहे. मशीनच्या मदतीने ढिगारा बाजुला हटवण्याचे काम सुरू आहे.

सध्या घटनास्थळी बचाव कार्य जलदगतीने सुरू करण्यात येत आहे. घटनेने भीतीचं वातावरण पसरलं आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली आहे. पुलाचा एक भाग कोसळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. काही मजुरांनी पळ काढत जीव वाचवला. परंतु कोसळलेल्या भागाखाली ६ मजूर दबले गेले आहेत. त्यांतील काहींना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

दुर्घटना घडल्यानंतर पोलीस मोठ्या संख्येने पोहोचले आहेत. एसडीआरएफ, भारतीय सैन्य दल, स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. दोन मजुरांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ४ मजुरांविषयी कोणतीही माहिती हाती आलेली नाही. त्याचा शोध सुरू आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांचा शोध लागेना झाला आहे. त्यामुळे मजुरांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. मजुरांचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची याचिका कुटुंबीय करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षेमध्ये गैरप्रकार

Washroom Hygiene Tips : पब्लिक वॉशरूममध्ये हायजिन मेंटेन ठेवण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Kairi Bhel Recipe: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी झटपट घरी बनवा कैरीची चटपटीत भेळ, वाचा सोपी रेसिपी

Pune News: झेडपीच्या शाळांमध्ये आता १० वीपर्यंतचे शिक्षण; पुणे जिल्ह्याचा निर्णय

Self Enumeration Census: India Census 2026: अखेर जनगणनेला सुरूवात! घरबसल्या 'स्व-गणना' करण्याची प्रक्रिया कशी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT