Jammu And Kashmir Terrorist Attack in ganderbal:  Saamtv
देश विदेश

Terrorist Attack: जम्मू-काश्मिरमध्ये भ्याड दहशतवादी हल्ला! कामगारांच्या तळावर अंधाधुंद गोळीबार, डॉक्टरसह ७ जणांचा मृत्यू

Jammu And Kashmir Terrorist Attack in ganderbal: या घटनेत दोन दहशतवाद्यांचा हात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस आणि लष्कराने परिसराची नाकेबंदी केली आहे.

Pramod Subhash Jagtap

Jammu And Kashmir Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग भागात रविवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी सात जणांची गोळ्या झाडून हत्या केली. मरण पावलेल्यांमध्ये दोन अधिकारी आणि तीन मजुरांचा समावेश आहे. याशिवाय एका स्थानिक डॉक्टरचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय आणि SKIMS श्रीनगरमध्ये दाखल करण्यात आले आहे. बोगद्याचे बांधकाम सुरु असताना हा भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी भारतीय सैन्याने परिसरात नाकाबंदी केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गांदरबल जिल्ह्यातील गुंड भागात बोगदा बांधण्याचे काम करत होते. या कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या खासगी कंपनीच्या कामगारांच्या तळावर दहशतवाद्यांनी रविवारी गोळीबार केला. ज्यामध्ये दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दोन दहशतवाद्यांचा हात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस आणि लष्कराने परिसराची नाकेबंदी केली आहे.

मृत्युमुखी पडलेल्या सात जणांमध्ये बिहारमधील फहीमान नसीर (सेफ्टी मॅनेजर), मोहम्मद हनिफ आणि कलीम यांचा समावेश आहे, तर अनिल शुक्ला (मेकॅनिकल मॅनेजर), जम्मूचे शशी अबरोल, पंजाबचे गुरमीत सिंग आणि काश्मीरचे डॉ. शाहनवाज यांचा समावेश आहे. रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा दलाचे एक पथक तसेच डीजीपीसह उच्च अधिकारीही घटनास्थळी उपस्थित असून परिसरात शोध मोहीम सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

या भ्याड हल्ल्यात सामील असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि आमच्या सुरक्षा दलांच्या जोरदार प्रत्युत्तराला सामोरे जावे लागेल. या अत्यंत दुःखाच्या क्षणी, मी मृतांच्या कुटुंबियांशी संवेदना व्यक्त करतो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. दरम्यान, दहशतवाद्यांकडून स्थानिक नसलेल्या लोकांच्या हत्येच्या घटनांमुळे परिसरात चिंता वाढली आहे. एप्रिल महिन्यातही दोन बिगर स्थानिक मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला, अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी अपहरण केल्यानंतर भारतीय लष्कराच्या एका जवानाचा गोळ्या झाडून मृत्यू झाल्याचे आढळून आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना कुणाची? सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरेसेनेला फटकारले; बेजबाबदार वक्तव्य थांबवा

PM Modi UAE Visit: तेल साठे ते एलपीजी पुरवठा; पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळाले?

Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

Shocking: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, २ महिलांचे केस कापून अर्धनग्न करत धिंड काढली

SCROLL FOR NEXT