Jammu and Kashmir Saam Tv
देश विदेश

Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश; ५ दहशतवाद्यांचा केला खात्मा

Jammu Kashmir News: सैन्याच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Vishal Gangurde

Jammu Kashmir News

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. माछील सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील सैन्याच्या जवानांनी गुरुवारी घुसखोरांचा कट उधळला. सैन्याच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सैन्याने आधी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. अशा प्रकारे सैन्यांच्या जवानांनी एकूण ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. (Latest Marathi News)

मीडियावर वृत्तानुसार, भारतीय सैन्य, जम्मू-काश्मीर पोलीस आणि गुप्तचर संस्थांनी २६ ऑक्टोबरला एक संयुक्त अभियान चालवलं. त्या अभियनाच्या माध्यामातून कुपवाडा सेक्टरच्या नियंत्रण रेषेवर जवानांनी घुसघोरांचा कट उधळला. पोलीस प्रशासनाने सांगितलं की, अभियानात सुरुवातीला दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीसांच्या प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा पोलीसांनी दिलेल्या सूचनांच्या आधारावर माछील सेक्टरमध्ये घुसखोऱ्यांचा तपास सुरु करण्यात आला. त्यानंतर माछीलमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी एकूण पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला.

सुरक्षा दलाच्या जवानांनी सुरुवातीला दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची पुष्टी एडीजीपी काश्मीरने दिली.

भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊदची हत्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जागतिक दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा खास व्यक्तीची हत्या करण्यात आली. दाऊद मलिक असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

जैश-ए-मोहम्मदसह दाऊद मलिक हा लश्कर-ए-जब्बर आणि लश्कर-आय-जांगवी या संघटनेसाठी काम करत होता. मसूद अजहर, हाफिज सईद, लखवी आणि दाऊद इब्राहिमसह युएपीएयसह भारताने या सर्वांना दहशतवादी घोषित केलं होतं.

पाकिस्तानच्या वजीरीस्तानमध्ये दाऊद मलिकची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात लोकांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

Tapola Tourism : महाबळेश्वरपासून हाकेच्या अंतरावर वसलय हिडन हिल स्टेशन पाहा काश्मिरसारखे सौंदर्य क्षणात

SCROLL FOR NEXT