Jammu and Kashmir  Saam Digital
देश विदेश

Jammu and Kashmir : गुलमर्गमध्ये हिमस्खलन; एका पर्यटकाचा मृत्यू, अनेक पर्यटक अडकल्याची भीती, पहा थरारक Video

Jammu and Kashmir Gulmarg Snowfall : जम्मू काश्मीरमधील जागतीक पर्यटनस्थळ असलेल्या गुलमर्गला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. या हिमवादळात अनेक विदेशी पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Sandeep Gawade

Jammu and Kashmir

जम्मू काश्मीरमधील जागतीक पर्यटनस्थळ असलेल्या गुलमर्गला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. या हिमवादळात अनेक विदेशी पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रेस्क्यू टीमच्या जवानांनी काही पर्यटकांनी सुरक्षित ठिकाणी हलवल आहे. मात्र काही पर्यटक अद्यापही अडकल्याची माहिती आहे. गुलमर्ग भागात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे.

डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंटन दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गुलमर्ग परिसात मोठी बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. दरम्यान आज दुपारी दोनच्या दरम्यान हिमवादळ आलं होतं. यात हिमस्खलन होऊन तीन विदेशी पर्यटक अडकले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर एक पर्यटक जखमी आहे. रेस्क्यू टीमकडून एका पर्यटकाचा शोध घेतला जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जम्मू-काश्मीर प्रशासनाने राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशारा दिला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून 7 रशियन पर्यटक स्कीइंगसाठी गेले. अशा परिस्थितीत हे सर्वजण बर्फाच्या वादळात अडकले. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व रशियन पर्यटक स्थानिक लोकांना न सांगता स्कीइंग करायला गेले होते. माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि 6 विदेशी पर्यटकांची सुटका केली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

Voter ID जवळ नाही, टेन्शन सोडा, तरीही मतदान करता येणार, ही १२ कागदपत्रेही आहेत ग्राह्य

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

SCROLL FOR NEXT