नवी दिल्ली : उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. बांदीपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.
बांदीपोराच्या अरागम भागात रविवारी उशिरापर्यंत चकमक सुरु होती. सुरक्षा दलाच्या जवानांनी बांदीपोरा भागाला चारी बाजूंनी घेरून सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. ड्रोनच्या मदतीने एका दहशतवाद्याचा मृतदेह आढळला. मृत दहशतवाद्याजवळ एम ४ रायफल देखील पाहायला मिळाली.
काश्मीरच्या बंदीपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. या चकमकीनंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल काश्मीरबाबत बैठक घेतली. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दल अलर्ट मोडवर आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून हल्ले सुरु आहेत.
जम्मू भागातही दहशतवादी हल्ल्याच्या एका पाठोपाठ चार घटना घडल्या. यानंतर भारतीय सशस्त्र दलाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान हे या स्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच या पार्श्वभूमीवर बैठकही घेणार आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी ९ जून रोजी दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला केला. दहशतवाद्यांनी सांयकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास केला. दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला. बेछुट गोळीबारानंतर बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस दरीत कोसळली.
जम्मू-काश्मीरच्या कठुआ गावांत मंगळवारी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या चकमकीनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.