James Webb Telescope  Saam Digital
देश विदेश

James Webb Telescope : जेम्स वेब टेलिस्कोपने टिपली पेंग्विन सारखी महाकाय आकाशगंगा; पृथ्वीपासून आहे इतक्या अंतरावर?

Sandeep Gawade

नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने पेंग्विन सारखी दिसणारी आणि अंडाकृती अशा दोन महाकाय आकाशगंगांचं दृश्य टिपलं आहे. या आकाशगंगा एकमेकांमध्ये विलीन होत असल्यांचा सुंदर क्षण टेलिस्कोपमध्ये कैद झाला आहे. विलीन होण्याची ही प्रक्रिया 25 ते 75 (Arp 142) दशलक्ष वर्षांपासून अविरत सुरू आहे. या आकाशगंगा एकमेकांमध्ये विलीन होताना काय त्याचा काय परिणाम होता, याची उत्सुकता शास्त्रज्ञांना आहे.

NASA च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा १२ जुलै रोजी दुसरा विज्ञान वर्धापन दिन होता. त्याचं औचित्य साधून या आकाशगंगांची प्रतिमा प्रसिद्ध केली आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हबलप्रमाणे पृथ्वीभोवती फिरत नाही, तर सूर्याभोवती भ्रमण करते. पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या सेकंड लॅग्रेंज पॉइंटवर (L2) पृथ्वीच्या सावलीत या टेलिस्कोपचं स्थान निश्चित करण्यात आलं आहे. इथलं तापमानही खूप कमी असतं. 25 डिसेंबर 2021 रोजी लॉन्च करण्यात आलेल्या दुर्बिणीने 12 जुलै 2022 रोजी विश्वाची पहिली निरीक्षणे शेअर केली. तेव्हापासून प्रकाशाच्या तरंगलांबी ओलांडून कॉस्मिक डान्सची ( Cosmic Dance) अभूतपूर्व क्षण टिपले आहेत, जे मानवी डोळ्यांना दिसणं अशक्य आहे.

NASA’s James Webb Space Telescope’s NIRCam (Near-Infrared Camera) आणि MIRI (Mid-Infrared Instrument) ने दोन आकाशगंगांची आश्चर्यकारक प्रतिमा कॅप्चर केली आहे. त्यांच्या आकारामुळे या आकाशगंगांना पेंग्विन आणि Egg अशी नावं देण्यात आली आहेत. Cosmic Dance लाखो वर्षांपूर्वी विलिनिकरणाच्या प्रक्रियेमुळे पेंग्विन आकाशगंगेत ताऱ्यांचा जन्म झाला आहे. आकाशगंगा विलीन होत असल्या तरी एकमेकांना गिळंकृत करण्याइतक्या त्या महाकाय आहेत. पृथ्वीपासून तब्बल 326 दशलक्ष वर्षे दूर या आकाशगंगांचं स्थान आहे.

नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, वेब टेलिस्कोपमधील आश्चर्यकारक छायाचित्र अंतराळातील घटना विश्वाची निर्मिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होणार आहे. अतरातील या घटनेबाबत शास्त्रज्ञ उत्साही आहेत. ही चित्रे अगदी प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीपर्यंतची आहेत, त्यामुळे पुढच्या पिढीसाठी यातून खूपकाही शिकता येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT