Keshav prasad maurya
Keshav prasad maurya Saam TV
देश विदेश

Agra: जामा मशीद मेट्रो स्टेशनचे होणार नामकरण, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आग्रा विभागाचे प्रभारी मंत्री केशव प्रसाद मौर्य (Deputy CM Keshav Maurya) यांनी जामा मशीद मेट्रो स्टेशनचे (Jama Masjid Metro Station) नाव बदलण्याची घोषणा केली आहे. माजी राज्यमंत्री आणि कॅन्टोन्मेंटचे आमदार डॉ.जी.एस.धर्मेश यांच्या प्रस्तावावर त्यांनी ही घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले की, आता मेट्रो स्टेशनचे नाव जामा मशीद नसून मनकामेश्वर मंदिर (Mankameshwar Temple) असणार आहे. केशव प्रसाद मौर्य गुरुवारी आग्रा येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गेले होते.

पॉवर हाऊसमध्ये असलेल्या जामा मशिदीत भूमिगत मेट्रो स्टेशन बांधले जात आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास केशव प्रसाद मौर्य मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी ताजच्या पूर्व गेटवर पोहोचले होते. त्याचवेळी माजी राज्यमंत्री आणि आग्रा कॅन्टोन्मेंटचे आमदार जीएस धर्मेश यांनी रेल्वे स्थानकाचे नाव मनकामेश्वर मंदिर मेट्रो रेल्वे स्टेशन असे करण्याची सूचना केली. उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ जामा मशीद मेट्रो स्टेशनचे नामकरण मनकामेश्वर मंदिर करण्याची शिफारस केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना आदेशही देण्यात आले. मेट्रोचे प्रकल्प संचालक अरविंद कुमार राय हेही उपस्थित होते.

चौपाल उभारून ग्रामस्थांशी संवाद साधला

उपमुख्यमंत्र्यांनी फतेहाबाद विधानसभा मतदारसंघाला भेट दिली. त्यांनी गावकऱ्यांसोबत बसून चौपाल उभारून त्यांच्याशी संवादही साधला. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी ग्रामस्थांकडून शासकीय योजनांची माहिती घेतली. सरकारी योजनांचा लाभ मिळतो का, असा सवाल त्यांनी केला. अनेक ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती नव्हती. याबाबत त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांनाही खडसावले.

शाळा, गोठ्याची, रेशनचीही पाहणी केली

मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य फतेहाबाद ब्लॉकला गेले. येथे पोहोचले असता त्यांनी रेशन दुकाने आणि शाळांचीही पाहणी केली. स्वतःच्या हाताने गायींना चाराही दिला. रेशन दुकान, शाळा आदीनंतर ते जिल्हा रुग्णालयातही तपासणीसाठी गेले. यानंतर त्यांनी विकास भवनातील विकासकामांचा आढावा घेतला.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींच केला खुलासा

Today's Marathi News Live: अमोल किर्तीकर यांचा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रोड शो

Amravati Crime : अमरावतीत गुंतवणुकीच्‍या नावाखाली ऑनलाईन फसवणुक, 10 अटकेत; 31 लाख 35 हजार लाटले

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

Maharashtra Politics 2024 : '४ जूनला आमच्या शपथविधीला या'; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं निमंत्रण

SCROLL FOR NEXT