Jama Masjid Saam TV
देश विदेश

Jama Masjid: जामा मशिदीतील महिला प्रवेश बंदीबाबतचा निर्णय रद्द; उपराज्यपालांच्या मध्यस्थीला यश

मशिदीत येणाऱ्या लोकांनी येथील पावित्र्य राखावे, अशी अट त्यांनी घातली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली : दिल्लीच्या (Delhi) जामा मशिदीत मुलीच्या प्रवेशबंदीबाबत शाही इमामांशी उपराज्यापाल व्हीके सक्सेना यांनी बातचित केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या उपराज्यपालांनी जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांना जामा मशिदीत महिलांच्या प्रवेशावर बंदी घालणारा आदेश रद्द करण्याची विनंती केली. इमाम बुखारी यांनी त्यांचा आदेश रद्द करण्याचे मान्य केले आहे. मात्र, मशिदीत येणाऱ्या लोकांनी येथील पावित्र्य राखावे, अशी अट त्यांनी घातली.

व्हीके सक्सेना आणि शाही इमाम बुखारी यांच्यातील चर्चेनंतर जामा मशीद प्रशासनाने महिलांच्या प्रवेशावर बंदी घालणारा आदेश मागे घेतला आहे. जामा मशिदीत महिलांच्या प्रवेशावर बंदी घालणारी नोटीस मशिदीच्या गेट क्रमांक 3 मधून काढण्यात आली आहे. माहिती देताना शाही इमाम यांनी मशिदीची पावित्र्य राखली पाहिजे यावर भर दिला.  (Latest Marathi News)

याआधी जामा मशिदीच्या प्रशासनाने मुख्य गेटवर नोटीस लावत मुलींना मशिदीत एकट्याने किंवा गटात प्रवेश करण्यास मनाई केली होती. या निर्णयावर टीका केल्यानंतर शाही इमाम म्हणाले होते की, नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्या मुलींसाठी हा आदेश नाही. शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांच्या म्हणण्यानुसार, मशिदीच्या परिसरात काही घटना समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

ते म्हणाले की जामा मशीद हे प्रार्थनास्थळ आहे आणि लोकांचे त्यासाठी स्वागत आहे. मात्र काही मुली एकट्या येऊन त्यांच्या मित्रांची वाट पाहतात. ही जागा या कामासाठी नाही. शाही इमाम म्हणाले होते की, मशीद असो, मंदिर असो किंवा गुरुद्वारा असो, ही प्रार्थनास्थळ आहेत. या कामासाठी येण्यावर कोणतेही बंधन नाही. आजच 20-25 मुली आल्या आणि त्यांना प्रवेश देण्यात आला.

दिल्ली महिला आयोगाची नोटीस

या प्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी जामा मशिदीच्या शाही इमामाला नोटीस बजावली होती. स्वाती मालीवाल म्हणाल्या की, हे अत्यंत लज्जास्पद आणि असंवैधानिक कृत्य आहे. त्यांना काय वाटतं, हा भारत नसून इराण आहे की, जेव्हा वाटेल तेव्हा ते महिलांशी भेदभाव करतील आणि त्यांना कोणी काही बोलणार नाही. पूजेचा पुरुषाला जितका अधिकार आहे तितकाच अधिकार स्त्रीला आहे. दिल्ली महिला आयोगाने शाही इमाम बुखारी यांना नोटीस बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

चिमुकलीचा हात खेळता खेळता लिफ्टच्या दरजावात अडकला; धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT