jalaun accident news / x saam tv
देश विदेश

Jalaun National Highway Accident : डुलकीनं केला घात; अयोध्येहून परतताना भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू

Jalaun Accident News : जालौनमध्ये नॅशनल हायवे २७ वर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. ललितपूरच्या सहा जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. अयोध्या दर्शनाहून परतताना ही दुर्घटना घडली.

Nandkumar Joshi

उत्तर प्रदेशात जालौन - झांसी - कानपूर नॅशनल हायवे २७ वर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. यात ६ जणांचा मृत्यू झाला. तर अन्य ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. कालपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोल्हुपूरजवळ चौरासा गुबंदजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेली आलिशान कार पाठीमागून ट्रकच्या खाली घुसली. ही धडक इतकी जोरात होती की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला.

प्राथमिक माहितीनुसार, कारचालकाला डुलकी लागल्यानं हा अपघात झाला. कारमधील भाविक अयोध्या दर्शनाहून ललितपूर येथे परतत होते. त्यांची कार जोल्हुपूर येथे पोहोचली. त्यावेळी अचानक चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. ही भरधाव कार पुढे असलेल्या ट्रकखाली घुसली. या अपघातात मृत्युमुखी पडलेले सहा भाविक हे ललितपूर येथील महरौनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरदौल मोहल्ल्यातील रहिवासी होते.

कारमध्ये अडकले होते मृतदेह

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जालौनचे जिल्हाधिकारी राजेश कुमार पांडेय, पोलीस अधीक्षक विनय कुमार सिंह, कालपी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अजय ब्रह्म तिवारी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस दलाकडून मदत आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. अपघातात कारचा पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला होता. कारमध्ये मृतदेह अडकले होते. तर जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

चालकाला लागली डुलकी

या अपघातानंतर हायवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी शर्थीच्या प्रयत्नांनंतर वाहतूक पूर्ववत केली. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. चालकाला डुलकी लागल्यानं नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अन्य बाजू देखील तपासण्यास सुरुवात केली आहे. या घटनेत मृत्यू झालेले सर्व भाविक ललितपूरचे रहिवासी होते. सर्व जण अयोध्या येथून दर्शनाहून ललितपूरला परतत होते. त्यावेळी कारचालकाला डुलकी लागली. त्यामुळे हा अपघात घडला, अशी माहिती पोलीस अधीक्षक विनय कुमार सिंह यांनी वृत्तसंस्थांना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, प्रति तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर

Thigh size: मांडीचा आकार सांगतो तुम्ही किती वर्षे जगणार? नव्या संशोधनातील धक्कादायक खुलासा

गुरुपौर्णिमा का साजरी करतात? जाणून घ्या यामागची जुनी परंपरा आणि इतिहास

Sugar Stock : साखर दर नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांवर घातले निर्बंध, आता इतकाच साठा ठेवता येणार

SCROLL FOR NEXT