देश विदेश

Crime News: बॉयफ्रेंड घरी येत होता, आजीला खटकलं; संतापलेल्या नातीने काढला काटा, असा झाला भंडाफोड

Shocking News In Uttar Pradesh: जालौन जिल्ह्यात ७२ वर्षीय महिलेची हत्या तिच्या २१ वर्षीय नात आणि तिच्या प्रियकर यांनी केली. चौकशीत पल्लवीने दोघांच्या हल्ल्याचे खुलासे केले आहेत.

Dhanshri Shintre

उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील भदेवरा गावात ७२ वर्षीय परमा देवी यांच्या हत्येचा पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. शुक्रवारी रात्री वृद्ध महिलेची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली होती. तपासात समोर आले की, ही हत्या बाहेरील कोणत्याही व्यक्तीने केलेली नाही. मृताची २१ वर्षीय नात पल्लवी जाटव आणि तिच्या प्रियकर दीपक यांनी मिळून ही हत्या केली आहे. आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले असून, दीपकच्या शोधात पोलिस छापे टाकत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी कोंच कोतवाली परिसरातील भदेवरा गावात हत्येची माहिती मिळाली. या माहितीनंतक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली. मृतक महिला तिच्या नात पल्लवीसोबत घरात राहत होत्या. आणि त्यांचा मुलगा कृष्णा बिहारी गुरांच्या गोठ्यात राहत होता. रात्री परमा देवी झोपली असताना, पल्लवी आणि तिचा प्रियकर दीपक घरात होते. या दरम्यान आजी उठली आणि त्यांना पाहून ओरडण्याचा प्रयत्न केला.

तपासात समोर आले की दीपकने जवळच पडलेला दगड उचलून परमा देवींच्या डोक्यावर मारले. बेशुद्ध झाल्यानंतर पल्लवीनेही त्यांच्या डोक्यावर काही वेळा मारहाण केली. या कारणामुळे महिला त्या ठिकाणी मरण पावल्या. हत्येनंतर दोघांनी बाथरूममध्ये हात धुतले आणि दीपक नंतर घरातून निघून गेला.

उपअधीक्षक परमेश्वर प्रसाद आणि पोलिस अधीक्षक डॉ. दुर्गेश कुमार यांनी घटनास्थळी तपास केला. प्रकरण उलगडण्यासाठी एसओजी सर्व्हिलन्स आणि कोच कोतवाली पोलीस तैनात केले होते. पल्लवी एएनएम शिक्षण घेणारी असून, तपासात तिच्या आणि दीपकच्या प्रेमसंबंधांची सविस्तर माहिती समोर आली आहे. ही घटना परिसरात धक्कादायक ठरली असून नागरिकांमध्ये संताप आणि चिंता पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसोबत आज मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील; वाचा राशीभविष्य

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

SCROLL FOR NEXT