President Of Bharat Saam Tv
देश विदेश

President Of Bharat: जी20 च्या डिनर निमंत्रण पत्रातून Indiaनाव वगळलं, काँग्रेसचा हल्लाबोल

G20 Summit In Delhi: संसदचं विशेष सत्र काही दिवसात सुरू होणार आहे. या विशेष सत्रात मोदी सरकार 'इंडिया' नावाऐवजी भारत वापरले जावे असं विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. यामुळे राजकारण तापलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

President of Bharat:

संसदचं विशेष सत्र काही दिवसात सुरू होणार आहे. या विशेष सत्रात मोदी सरकार 'इंडिया' नावाऐवजी भारत वापरले जावं, असं विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. यामुळे राजकारण तापलंय. जी२० च्या समारोहात दिल्या जाणाऱ्या डिनर पार्टीच्या निमंत्रणपत्रात 'इंडिया' ऐवजी 'भारत' नाव वापरण्यात आल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी 'एक्स' या सोशल मीडियाच्या वेबसाईटवर केलाय. (Latest News on G20)

संसदेचं 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. इंडिया शब्द हटवण्यासाठी विधेयक येणार असल्याची चर्चा आता सुरू आहे. या अधिवेशनात इंडिया शब्द हटवण्यासाठी विधेयक येण्याची शक्यता वर्तवली जातेय. भारतीय घटनेमधून इंडिया शब्द कायमचा हटवण्यासाठी केंद्र सरकारनं तयारी सुरू केल्याची माहिती आहे.

'इंडिया' नाव हटविण्यासंबंधीच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केलेल्या 'एक्स' या सोशल मीडिया साईटवर केलेल्या पोस्टवर स्पष्ट होत आहे. इंडिया शब्दावर वाद वाढू लागलाय. याचदरम्यान राष्ट्रपती भवनातून देण्यात आलेल्या डिनर निमंत्रण पत्रिकेत 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख करण्यात आलाय.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी सोशल मीडिया वेबसाईट 'एक्स'वर याविषयीचे पोस्ट केलंय. राष्ट्रपती भवनात ९ सप्टेंबरला जी२० डिनरच्या निमंत्रण पत्रिकेत हा करण्यात आलेल्या बदलावरून काँग्रेसकडून हल्लाबोल केला जात आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी 'एक्स' या सोशल साईटवर म्हटलंय की, हे खरं आहे. राष्ट्रपती भवनात ९ सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेल्या जी२० च्या डिनर पार्टीचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यात प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिण्यात आलंय.

जर आपण संविधानमधील आर्टिकल १ वाचलं तर त्यात लिहिलं की, भारत जे इंडिया आहे, ते राज्यांचा एक समूह असेल. यामुळे आता राज्यांच्या समुहावर धोका निर्माण होत असल्याचं जयराम रमेश यांनी म्हटलंय. दरम्यान, केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या काळात संसदेचं विशेष सत्र बोलवलंय. या सत्रात अमृतकाळाशी संबंधीत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. परंतु या सत्राचा निश्चित, असा कोणताच अजेंडा समोर आलेला नाही. याचमुळे विविध चर्चांना ऊत आलाय.

या विशेष सत्रात एक देश एक निवडणूक, महिला आरक्षण विधेयक, इंडियाऐवजी भारत नावाचा वापर करण्याचे विधेयक सादर केले जाण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्याविरोधात विरोधी पक्षांनी मिळवून एक आघाडी बनवलीय, ज्याचे नाव इंडिया (INDIA)ठेवण्यात आलंय. दिवसेंदिवस 'इंडिया'ची वाढती क्रेझ पाहता मोदी सरकारची चिंता वाढलीय.

विरोधकांच्या एकीचा लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो, याची जाणीव असल्याने भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केलीय. इंडिया आघाडीला धक्का देण्यासाठी केंद्र सरकार नवा डाव आखत इंडिया नाव हटवण्याचा निर्णय घेण्याचं विधेयक आणत आहे.

भाजपचे नेते मंडळी भारत शब्दाची मागणी करू लागले आहेत. संपूर्ण देशाची मागणी आहे की 'इंडिया' ऐवजी भारत शब्दाचा वापर केला पाहिजे. इंग्रजांनी 'इंडिया' शब्द एका शिवीप्रमाणे आपल्यासाठी वापरलाय. तर भारत हा शब्द हा आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. मला वाटतं की संविधानमध्ये बदल केला पाहिजे आणि भारत शब्द तेथे जोडला गेला पाहिजे, असं भाजपचे खासदार हरनाथ सिंह यादव म्हणालेत.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी एक्सवर पोस्ट केलंय की, रिपब्लिक ऑफ भारतासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा विषय आहे. आपला देश अमृतकाळाकडे प्रचंड वेगाने जात आहे. भाजप खासदार हरनाथ सिंह यादवाप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही याची मागणी केलीय.

'इंडिया' ऐवजी भारत नावाचा वापर करावा, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय. या देशाचं नाव इंडिया नसून भारत आहे. यामुळे आधीपासून ज्या नावाने ओळखण्यात येत आहे, तेच नाव लोकांनी वापरावे. असं मोहन भागवत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT