BMW Saam Tv
देश विदेश

BMW आणि ५ कोटी, बायकोने मागितला हुंडा, वायुसेना महिला अधिकाऱ्याच्या विरोधात नवरा कोर्टात

Viral News : एका पत्नीने पतीकडे हुंडा मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीने त्याच्या पतीकडून आलिशान बीएमडब्लू कार आणि ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने पत्नी आणि तिच्या पालकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Yash Shirke

देशात अजूनही काही ठिकाणी हुंडा प्रथा सुरु असल्याचे पाहायला मिळते. पतीवर आणि त्याच्या कुटुंबियांवर हुंडा मागण्याचा आरोप केला जातो. पण पत्नीने हुंडा मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीने पतीकडून बीएमडब्लू कार आणि ५ कोटी रुपये हुंडा म्हणून मागितले आहेत. ही घटना राजस्थानमधील जयपूरमध्ये घडली आहे. या प्रकरणात जयूपर मेट्रो न्यायालयाने पत्नी आणि तिच्या पालकांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पीडित पती मर्चंट नेव्हीमध्ये आहे, तर आरोपी पत्नी हवाई दलात वरिष्ठ पदावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित पतीचे नाव अभिनव जैन असे आहे. अभिनवने त्याची पत्नी आणि तिच्या पालकांवर हुंडा मागितल्याचे आरोप केले आहे. बीएमडब्ल्यू कार आणि ५ कोटी रुपये मागितल्याचे त्याने म्हटले आहे. अभिनव आणि त्याच्या पत्नीचे दुसरं लग्न आहे. यापूर्वी अभिनवने वैचारिक मतभेदांमुळे त्याच्या पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतला होता. तर त्याच्या पत्नीचा पहिला पती विमान अपघातात मृत्युमुखी पडला होता.

सोशल मीडियावर अभिनव आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीशी भेट झाली. भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये लग्न झाले. लग्नासाठी १५ लाख रुपये खर्च झाला, जो मी केला, असे अभिनवने म्हटले आहे. लग्नानंतर माझ्या पत्नीचे वर्तन बदलले. तिची बदली जयपूरला झाली. जयपूरला आल्यानंतर तिच्या वागण्यात आणखी बदल झाला. तिने मला छळायला सुरुवात केली. तिच्या आईवडिलांनीही मला त्रास दिला, असे अभिनवने पोलिसांना सांगितले.

'माझ्या पत्नीने आलिशान गाडीची मागणी केली. गाडी दिली नाही तर घटस्फोट होईल असे ती म्हणाली. माझ्या मुलाला भेटण्याची मला परवानगी नाहीये. जेव्हा मी माझ्या मुलाला भेटायला गेलो, तेव्हा माझ्या पत्नीने बीएमडब्लू कार आणि ५ कोटी रुपये देण्यास सांगितले. या गोष्टी दिल्यानंतरच मुलाला भेटायची परवानगी मिळेल असा दम त्यांनी दिला' अशी माहिती अभिनव जैनने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT