Jaipur Delhi Expressway Accident News Saam Tv
देश विदेश

Accident News : ड्युटी संपवून परतणाऱ्या पोलिसांच्या कारचा भीषण अपघात; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Jaipur Delhi Expressway Accident News : जयपूर-दिल्ली द्रुतगती मार्गावर भरधाव ट्रकने पोलिसांच्या वाहनाला धडक दिल्याने उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी ट्रक चालक फरार असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • जयपूर-दिल्ली महामार्गावर भीषण अपघात

  • उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू

  • तिघे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

  • ट्रक चालक घटनास्थळावरून फरार

जयपूर-दिल्ली द्रुतगती मार्गावर आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने पोलिसांच्या वाहनाला मागून धडक दिली, यात उपनिरीक्षक पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले इतर तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, करौली जिल्ह्यातील सपोत्रा ​​पोलीस ठाण्यात तैनात असलेले उपनिरीक्षक हनुमान सहाय मीना, कॉन्स्टेबल काजड चौधरी, रामराज बैरवा आणि रामनरेश मीना हे चौघे फसवणुकीच्या एका प्रकरणाचा तपास करून मेरठहून परत येत होते.

दरम्यान जयपूर-दिल्ली द्रुतगती मार्गावर आंधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगल बेला येथे सकाळी सुमारे ५:३० वाजताच्या सुमारास एका अनियंत्रित ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पोलिसांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले.

या दुर्घटनेत उपनिरीक्षक हनुमान सहाय मीना यांचा जागीच मृत्यू झाला, तर कॉन्स्टेबल काजड चौधरी, रामराज बैरवा आणि रामनरेश मीना गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी पोलीस ट्रकचालकाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT