Jagdish Dhankhar saam tv
देश विदेश

Vice Presidential election 2022: उपराष्ट्रतिपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखर विजयी

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जगदीप धनखर आणि विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत होती. या लढतीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जगदीप धनखर विजयी झाले आहे.

Vishal Gangurde

Vice Presidential election 2022 News : देशाच्या नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी आज संसद भवनात मतदान पार पडले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे मतदान पार पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जगदीप धनखर आणि विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत होती. या लढतीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) जगदीप धनखर (Jagdish Dhankhar) विजयी झाले आहे. त्यामुळे जगदीप धनखर हे भारताचे १६ वे उपराष्ट्रपती ठरणार आहेत.

देशाच्या नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी संसद भवनात मतदान पार पडले. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जगदीप धनखर विजयी झाले आहेत. तर विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत जगदीप धनखर यांना ५२८ मतं मिळाली, तर मार्गारेट अल्वा यांना १८२ मतं मिळाली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जगदीप धनखर यांचा विजय झाल्यानंतर भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत विजय झाल्याने जगदीप धनखर हे भारताचे नवे उपराष्ट्रपती होणार आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ११ ऑगस्ट रोजी धनखर हे उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील.

जगदीप धनखर यांची भारताच्या पुढील उपराष्ट्रपतिपदी निवड झाल्याने लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष एकाच राज्याचे झाले आहेत. सध्या ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

कोण आहेत जगदीप धनखर ?

राजस्थानातील झुनझुनू जिल्ह्याच्या किठाना गावात त्यांचा जन्म झाला. बारावीनंतर पदार्थ विज्ञानामध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर राजस्थान विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला. धनखर हे आयआयटी, एनडीए आणि आयएएस परीक्षाही उत्तीर्ण आहेत. राजस्थान उच्च न्यायालयाबरोबरच विविध राज्य आणि सर्वोच्च न्यायालयातही वकिली त्यांनी केली आहे. धनखर हे १९८९ ला जनता दलाच्या उमेदवारी पहिल्यांदा झुनझुनूचे खासदार होते. काँग्रेसमध्ये प्रवेश करून किशनगड येथून १९९३ मध्ये आमदार झाले. २००३ ला काँग्रेसशी फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला. ३० जुलै २००९ रोजी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

SCROLL FOR NEXT