नवी दिल्ली - सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. 72 दिवसांहून अधिक काळ पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल झालेला नाही, हा मोठा दिलासा आहे. गेल्या वेळी केंद्रातील मोदी सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर अनेक राज्यांनीही व्हॅट कमी करून जनतेला दिलासा दिला.
महाराष्ट्रात व्हॅट कपातीची घोषणा
नुकतीच महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली होती, त्यानंतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 5 रुपयांनी आणि डिझेलवर 3 रुपयांनी कपात केली.
हे देखील पाहा -
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबई शहरात पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
बृहन्मुंबईमध्ये पेट्रोल 106.49 रुपये आणि डिझेल 94.44 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोल 105.99 रुपये आणि डिझेल 92.51 रुपये प्रति लिटर.
नाशिकमध्ये पेट्रोल 106.22 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.73 रुपये प्रतिलिटर
नागपुरात पेट्रोल 106.21 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर
कोल्हापुरात पेट्रोल 106.75 रुपये आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर.
दिल्ली, मुंबईसह चार प्रमुख महानगरांमध्ये इंधनाचे दर
दिल्लीत आज पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 276 रुपये प्रति लिटर
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.